डिफाइनेज सिक्युरिटीजतर्फे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा’ सादर

 डिफाइनेज सिक्युरिटीजतर्फे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा’ सादर



पुणे येथे मुख्यालय असलेल्या, नाविन्यपूर्ण ट्रेडिंग टूल्स आणि गुंतवणूकदारांच्या शिक्षणाच्या मजबूत परिसंस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या डिफाइनेज सिक्युरिटीज ब्रोकिंग प्रा. लि. या फिनटेक व स्टॉक ब्रोकिंग कंपनीने आज आपला आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा’ सादर केला. प्लॅटफॉर्म शुल्क शून्य असलेला आणि भारतातील पहिला पूर्णपणे कस्टमाइझ करता येणारा हा रिटेल ट्रेडिंग ऑटोमेशन प्लॅटफॉर्म आहे. सेबीने ऑक्टोबर २०२५ मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी अल्गोरिदमिक ट्रेडिंग अधिकृतपणे खुले केले, त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत हा ‘अल्गोस्ट्रा’ प्लॅटफॉर्म सादर होत असल्याने, हा क्षण भारतीय रिटेल ट्रेडिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

रिटेल ट्रेडिंग ऑटोमेशन प्लॅटफॉर्म सादर करण्यासाठी आताचीच वेळ अतिशय योग्य आहे. ‘सेबीच्या स्वतःच्या अभ्यासानुसार, एफवाय २४मध्ये एफ अँड ओ विभागात अल्गोरिदमिक ट्रेडिंगवर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स यांचेच वर्चस्व राहिले. एफपीआय नफ्यातील ९७ टक्के आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्सच्या नफ्यातील ९६ टक्के हिस्सा त्यांनी मिळवला. मात्र, या शिस्तबद्ध व प्रणालीबद्ध ट्रेडिंगच्या फायद्यापासून रिटेल गुंतवणूकदार आजवर आणि अगदी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर दूरच राहिले होते.

वैयक्तिक गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील सहभाग सातत्याने वाढत असून, ‘एनएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक मार्च २०२० पासून ५ पट वाढून ८४ लाख कोटींवर पोहोचली आहे (एनएसई पल्स रिपोर्ट सप्टेंबर २०२५). सूत्रांच्या माहितीनुसार, भारतातील अल्गोरिदमिक ट्रेडिंग मार्केट २०३० पर्यंत १४.३ टक्के सीएजीआरने वाढण्याचा अंदाज आहे. देशातील २४ कोटींहून अधिक रिटेल गुंतवणूकदार शिस्तबद्ध आणि प्रक्रिया-आधारित गुंतवणूक पद्धतीच्या शोधात आहेत. अशा वेळी नाविन्यपूर्ण व प्रोसेस-ड्रिव्हन रिटेल ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठी तातडीची आणि मोठी गरज निर्माण झालेलीच आहे.

डिफाइनेज सिक्युरिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक प्रशांत शहा म्हणाले, “मागील खूप काळापासून अनेक संस्था अल्गो ट्रेडिंगमधून नफा कमावत असल्याचे रिटेल ट्रेडर्स पाहत होते. ही प्रणाली ‘खूप गुंतागुंतीची’ किंवा ‘खूप महागडी’ असल्याचे या ट्रेडर्सना सांगितले जात होते. मुळात, बहुसंख्य ट्रेडर्स हे त्यांच्या धोरणात्मक चुकांमुळे अपयशी ठरत नाहीत; तर भावनिक निर्णय आणि थकव्यामुळे त्यांच्या धोरण अंमलबजावणीमध्ये चुका होतात, म्हणून ते अपयशी ठरतात. ‘अल्गोस्ट्रामुळे ट्रेडिंग एखाद्या यंत्राप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध आणि अचूक पद्धतीने होते. अर्थात, ट्रेडर्सच्या विचारप्रक्रियेची जागा घेणे हा येथे आमचा उद्देश नाही, तर भावनांचा परिणाम टाळून निर्णय अधिक सुरक्षित आणि योग्य बनवणे हा उद्देश आहे.”

संस्थात्मक मक्तेदारीला छेद

ट्रेड कॉल्स किंवा टिप्स देण्याऐवजी, ‘डिफाइनेजकडील अल्गोस्ट्रा प्लॅटफॉर्म हा ट्रेडर्सना त्यांच्या स्वतःच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज पूर्णपणे ऑटोमेटेड सिस्टीममध्ये रूपांतरित करण्याची क्षमता देतो, तेही संपूर्ण पारदर्शकतेसह. हा प्लॅटफॉर्म बाजाराचा अंदाज वर्तवत नाही किंवा नफ्याची हमी देत नाही. त्याऐवजी, तयार केलेल्या स्ट्रॅटेजीनुसार अचूक, सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्यवहारांची अंमलबजावणी कशी होईल, यावर त्याचा भर आहे.

शून्य प्लॅटफॉर्म शुल्क. शून्य कोडिंग.

अल्गोस्ट्राचा मूल्यप्रस्ताव तीन मूलभूत स्तंभांवर आधारित आहे. या उद्योगातील प्रस्थापित पद्धतींना त्यांतून थेट आव्हान दिले जाते :

1)         शून्य प्लॅटफॉर्म शुल्क: ‘डिफाइनेजच्या डिमॅट खातेधारकांसाठी खास उपलब्ध असलेल्या अल्गोस्ट्रा प्लॅटफॉर्मसाठी कोणतेही प्लॅटफॉर्म शुल्क आकारले जात नाही.

2)         शून्य कोड ऑटोमेशन: ट्रेडर्सना एकाही ओळीचा कोड न लिहावा लागत नाही आणि तरीही ते प्रगत व सुस्पष्ट अल्गोरिदम तयार करू शकतात. यामुळे आतापर्यंत अनेकांना सिस्टेमॅटिक ट्रेडिंगपासून दूर ठेवणारा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे.

3)         पारदर्शकता: अल्गोस्ट्रा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या ट्रेडर्सना त्यांच्या सिस्टीममधील प्रत्येक नियम नीट समजतो. ते त्या नियमांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात आणि सिस्टीम पूर्णपणे त्यांची स्वतःची राहते.

वैयक्तिक ट्रेडर्ससाठी संस्थात्मक दर्जाच्या क्षमता

सिस्टीमॅटिक विचार करणाऱ्या ट्रेडर्ससाठी खास बनविलेल्या या ‘अल्गोस्ट्रासोबत तुम्ही :

           एका वेळी जास्तीत जास्त १० स्ट्रॅटेजीज चालवू शकता, आणि प्रत्येक स्ट्रॅटेजीसाठी ५०० पर्यंत इन्स्ट्रुमेंट्सवर काम करू शकता,

           कँडल स्टिक, हेइकिन आशी, पॉइंट अँड फिगर, रेंको, लाईन ब्रेक आणि कागी अशा सहा प्रकारच्या चार्टिंग पद्धतींनी ऑटोमेशन करू शकता,

           स्टॉक्स, फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी एकाच एकसंध फ्रेमवर्कमध्ये स्ट्रॅटेजीज डिझाइन करू शकता,

           स्ट्रॅटेजी तयार करताना तुम्ही नफा आणि तोट्याच्या मर्यादा ठरवू शकता, ट्रेंड ओळखण्यासाठी फिल्टर्स लावू शकता, तसेच नफा-तोटा वेगवेगळ्या पद्धतीने मोजण्यासाठी स्वतंत्र ‘प्रॉफिट अॅंड लॉस ट्रॅकिंगसह प्रगत स्वरुपाची रिस्क कंट्रोल्स वापरू शकता.

आम्ही केवळ ‘आणखी एक’ ट्रेडिंग टूल सादर करीत नाही आहोत, तर भारतीय रिटेल ट्रेडर्स हे बाजाराशी कशा पद्धतीने जोडले जावेत, यासाठीच्या संरचनात्मक आणि मूलभूत सुधारणा घडवून आणत आहोत,” असे सांगून शहा पुढे म्हणाले, “अल्गोस्ट्रामुळे रिटेल ट्रेडर्स हे एकंदर प्रक्रिया, नियंत्रण आणि जबाबदारी या बाबतीत संस्थात्मक दर्जाच्या अधिक जवळ जातील, आणि तरीही प्रामाणिक ट्रेडर्सना अपेक्षित असलेली पारदर्शकता व स्वामित्व कायम राहील.”

विश्वास आणि नवोन्मेषाच्या भक्कम पायावर उभारणी

डिफाइनेजचा अल्गो ट्रेडिंगमधील प्रवेश हा दशकभराहून अधिक काळ चाललेल्या उत्पादन-नवोन्मेषाच्या भक्कम आधारावर झाला आहे. आरझोन, ट्रेडपॉईंट, झोन मोबाईल अॅप, मोमेंटिफाय आणि २४ लाख वापरकर्त्यांना सेवा देणारा ऑप्शन्स अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म ‘ऑपस्ट्रॉ’ अशा अनेक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म्सद्वारे ही वाटचाल घडली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कंपनीच्या पहिल्या एंजेल फंडिंग राउंडनंतर हे सादरीकरण करण्यात आले.

नियंत्रित टप्प्याटप्प्याने सादरीकरण आणि ‘अर्ली अ‍ॅडॉप्टर्ससाठी विशेष लाभ

अल्गोस्ट्राचे सादरीकरण प्रतीक्षायादीनुसार नियंत्रितपणे टप्प्याटप्प्यात करण्यात येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सामील होणाऱ्या वापरकर्त्यांना प्राधान्यक्रमाने प्रवेश, ऑनबोर्डिंगसाठी विशेष सहाय्य, तसेच प्लॅटफॉर्मच्या पुढील फीचर्सच्या विकासावर प्रभाव टाकण्याची संधी मिळेल.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth