अमागी मीडिया लॅब्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ १३ जानेवारीपासून खुला
अमागी मीडिया लॅब्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ १३ जानेवारीपासून खुला
कंपनीने प्रत्येक शेअरची किंमत ₹३४३ ते ₹३६१ अशी निश्चित केली आहे. प्रत्येक शेअरचे मूल्य ₹५ आहे. गुंतवणूकदार किमान ४१ शेअर्ससाठी अर्ज करू शकतात आणि त्यानंतर ४१ शेअर्सच्या पटीने जास्त अर्ज करता येईल.
हा निर्गम दोन भागांत विभागलेला आहे. कंपनी नवीन शेअर्स जारी करून सुमारे ₹८१६ कोटी रुपये उभारणार आहे (फ्रेश इश्यू). तसेच, विद्यमान भागधारक (विक्रेते) सुमारे २.६९ कोटी शेअर्स विकणार आहेत (ऑफर फॉर सेल). एकूण निर्गमाचा आकार सुमारे ₹१,७८८ कोटी रुपये इतका आहे.
विक्रेत्यांमध्ये प्रमुख गुंतवणूक निधी आणि काही व्यक्तींचा समावेश आहे. यात PI Opportunities Fund, Accel India, Trudy Holdings, Norwest Venture Partners यांसारख्या निधींचा समावेश आहे. तसेच काही वैयक्तिक विक्रेतेही आहेत.
हा आयपीओ बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे होणार आहे. यात किमान ७५% हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) राखीव आहे. यापैकी काही भाग अँकर गुंतवणूकदारांसाठी ठेवण्यात येईल. उर्वरित हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NIB) आणि किरकोळ गुंतवणूकदार (RIB) यांच्यासाठी उपलब्ध असेल. सर्व गुंतवणूकदारांना (अँकर वगळता) ASBA प्रक्रियेचा वापर करावा लागेल. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही शेअर बाजारांवर सूचीबद्ध होतील. या IPO साठी कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटीग्रुप, गोल्डमनसेच, आयआयएफएल कॅपिटल आणि अवेंदूस कॅपिटल हे हे प्रमुख व्यवस्थापक आहेत.

Comments
Post a Comment