एफटीआयआय ( FTII) आणि फिल्मसिटी मुंबईमार्फत अल्प कालावधीचे अभ्यासक्रमवर्ग सुरू होणार
एफटीआयआय ( FTII) आणि फिल्मसिटी मुंबईमार्फत अल्प कालावधीचे
अभ्यासक्रमवर्ग सुरू होणार
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या चित्रांगण सभागृहात २ ते १९ फेब्रुवारीपर्यत
मुंबई, दि. १८: पुणे येथील `फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (एफटीआयआय) आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत अभिनय, लघुपट कथा लेखन आणि चित्रपट तयार करण्याबरोबरच चित्रपटातील करिअरच्या संधीबाबत मूलभूत लघू अभ्यासक्रमवर्ग सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून नवोदित व होतकरू तरुणांसाठी ही संधी उपलब्ध होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्म सिटी) मधील चित्रांगण हॉलमध्ये अभ्यासक्रमाचे वर्ग होणार आहेत. यामध्ये चित्रपट तयार करण्याची कला आणि चित्रपटातील करिअरबाबत २ ते ४ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत अभ्यासक्रम होईल.
त्याचे शुल्क ३५०० रुपये आहे. तर लघुपट लेखनाबाबत प्राथमिक माहिती देणारा वर्ग ५ ते ९ फेब्रुवारीपर्यंत होईल. त्याचे शुल्क ११ हजार रुपये आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांचे सत्र संचालक डॉ. मिलिंद दामले आहेत तर अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे १० ते १९ फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषेतून अभिनय या विषयावर प्रशिक्षण होणार असून अभ्यासक्रमाचे शुल्क १७ हजार रुपये आहे. दिनांक २२ जानेवारीपर्यंत करता येणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या: www.ftii.ac.in/p/vtwa अधिक माहितीसाठी मिलिंद जोशी - ०२०-२५५८००८५,९७०२२७०८२१
Comments
Post a Comment