Motorola ने Motorola Signature लाँचसह भारतातील प्रमुख श्रेणीमध्ये विशेष भर केली
Motorola ने Motorola Signature लाँचसह
भारतातील प्रमुख श्रेणीमध्ये विशेष भर केली
या नवीन स्मार्टफोनमध्ये डीएक्सओएमएआरके^ द्वारे प्रमाणित जगातील सर्वोत्तम कॅमेरा, भारतातील पहिल्या 24X7 प्रीव्हिलेज सर्विसेससह सिग्नेचर क्लब, आकर्षक फिनिशेस् आणि प्रमुख कार्यक्षमता व एआय आहे, किंमत फक्त Rs. 54,999* पासून सुरू होते
Motorola Signature डीएक्सओएमएआरके* कडून गोल्ड लेबल कॅमेरा मान्यतेसह इमेजिंगमध्ये नवीन जागतिक मापदंड स्थापित करतो. या स्मार्टफोनमध्ये जगातील पहिला व सर्वात प्रगत सोनी एलवायटीआयए बी2बी मेन कॅमेरा आहे, ज्यामध्ये डॉल्बी व्हिजन व्हिडिओ व 8के व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ज्यामधून अपवादात्मक सुस्पष्टता, गतीशील रेंज आणि पॅन्टोन प्रमाणित अचूक रंगसंगतीसह प्रोफेशनल-ग्रेड फोटोग्राफी व सिनेमॅटिक व्हिडिओ निर्मितीची खात्री मिळते.
Motorola Signature अत्यंत सडपातळ प्रोफाइलसह सुधारित लक्झरी कारागिरीचा अनुभव देतो. या स्मार्टफोनमध्ये फॅब्रिक-प्रेरित प्रीमियम फिनिशसह अचूकरित्या डिझाइन करण्यात आलेली एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनिअम फ्रेम आहे, जेथे वैशिष्ट्यपूर्ण प्रीमियम डिझाइन शैलीमध्ये आकर्षकता, आरामदायीपणा आणि टिकाऊपणाचे संयोजन आहे.
Motorola Signature मध्ये जगातील एकमेव ट्रिपल सोनी एलवायटीआयए™ प्रो-ग्रेड कॅमेरा सिस्टम आहे, जी डीएक्सओएमएआरके गोल्ड लेबल सर्टिफिकेशनसह प्रमाणित आहे, ज्यामधून वास्तविक स्थितींमध्ये अपवादात्मक फोटो व व्हिडिओ कार्यक्षमतेची खात्री मिळते. डीएक्सओएमएआरकेच्या कॅमेरा परफॉर्मन्स इंडेक्सवर 164 च्या कॅमेरा स्कोअरसह मोटोरोला सिग्नेचर भारतातील INR 100,000 श्रेणी अंतर्गत पहिल्या क्रमांकाचा कॅमेरा फोन बनला आहे. या सिस्टममधील खासियत म्हणजे 50 मेगापिक्सल सोनी एलवायटीआयए™ बी2बी मेन कॅमेरा. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा 50 मेगापिक्सल सेन्सर प्रगत सिनेमॅटिक इमेजिंग देतो, ज्यामध्ये जवळपास 60 एफपीएसमधील 8के व 4के मधील डॉल्बी व्हिजन® व्हिडिओ रेकॉर्डिंग, क्वॉड पिक्सल तंत्रज्ञान, प्रगत नॉईज रिडक्शन आणि 3.50 ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन आहे, ज्यामधून कोणत्याही प्रकाश स्थितीमध्ये अत्यंत स्थिरपणे फोटो कॅप्चर होण्याची खात्री मिळते. याला पूरक 50 मेगापिक्सल सोनी एलवायटीआयए™ 600 पेरिस्कोप कॅमेरासह 3x ऑप्टिकल झूम, ओआयएस आणि जवळपास 100x सुपर झूम प्रो, 50 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड + मॅक्रो व्हिजन कॅमेरासह 1220 फिल्ड ऑफ व्ह्यू व क्लोज-फोकस मॅक्रो क्षमता आणि 60 एफपीएसमध्ये 4के व्हिडिओ क्षमता असलेला 50 मेगापिक्सल सोनी एलवायटीआयए™ 500 फ्रण्ट कॅमेरा आहे. संपूर्ण कॅमेरा सिस्टम पॅन्टोन™ व्हॅलिडेटेड कलर आणि स्किनटोन™ कॅलिब्रेशन व मल्टीस्पेक्ट्रल 3-इन-1 लाइट सेन्सरसह अधिक सुधारण्यात आली आहे, ज्यामधून अचूक एक्स्पोजर, व्हाइट संतुलन आणि वास्तविक रंगसंगती निर्मितीची खात्री मिळते.

Comments
Post a Comment