गौडीयम आयव्हीएफ अँड वुमेन हेल्थ लिमिटेडची इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री 20 फेब्रुवारी 2026 पासून होणार सुरू
गौडीयम
आयव्हीएफ अँड वुमेन हेल्थ लिमिटेडची
इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री 20 फेब्रुवारी 2026 पासून होणार सुरू
·
प्रत्येकी 5
रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 75 रुपये ते 79 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
·
प्रमुख गुंतवणूकदारांची
बोली सुरु आणि बंद होण्याचा दिनांक बुधवार, 18 फेब्रुवारी
2026 आहे.
·
बोली/ऑफर शुक्रवार
20 फेब्रुवारी 2026 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी बंद होईल.
·
बोली किमान 189 इक्विटी
शेअर्ससाठी आणि त्यानंतर 189 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
गौडीयम आयव्हीएफ अँड वुमेन हेल्थ लिमिटेडची (“Gaudium IVF” किंवा “कंपनी”) ने इक्विटी शेअरसाठी शुक्रवार 20
फेब्रुवारी 2026 पासून प्राथमिक
समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
या ऑफरमध्ये कंपनीकडून एकूण 1,13,92,500 पर्यतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“Fresh Issue”) आणि प्रवर्तक विक्री समभागभागधारक (“Selling Shareholder”) असलेल्या डॉ. मणिका खन्ना यांच्याकडून 94,93,700 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (“Offer for Sale”) यांचा समावेश आहे.
कंपनीने निव्वळ उत्पन्नाचा उपयोग नवीन आयव्हीएफ केंद्रांच्या स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या निधीसाठी, कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/पूर्वपरतफेड करणे आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“Objects of the Offer”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
प्रमुख गुंतवणूकदारांची बोली सुरु आणि बंद होण्याचा दिनांक बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 आहे. बोली/ऑफर शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी 75 रुपये ते 79 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 189 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 189 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
इक्विटी शेअर्स आरएचपी द्वारे सादर करण्यात येत आहेत. आरएचपी द्वारे सादर करण्यात येत असलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेडचे मेन बोर्ड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील. सारथी कॅपिटल ॲडव्हायर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठीचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
Comments
Post a Comment