गोदरेज बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये मुंबई कॅम्पस सुरू करण्यासाठी इलिनॉय टेकचा सामंजस्य करार; विद्यार्थ्यांची पहिली तुकडी 2026 च्या शैक्षणिक सत्रात दाखल होणार
गोदरेज बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये मुंबई कॅम्पस सुरू
करण्यासाठी इलिनॉय टेकचा सामंजस्य करार; विद्यार्थ्यांची पहिली तुकडी
2026 च्या शैक्षणिक सत्रात
दाखल होणार
गोदरेज समूहासोबतच्या सामंजस्य कराराद्वारे इलिनॉय
टेकने भारतासोबतच्या आपल्या भागीदारीचा ऐतिहासिक विस्तार केला आहे. माजी
विद्यार्थी जमशेद एन. गोदरेज यांच्या वारशाचा सन्मान करत अमेरिकेचे उत्कृष्ट
तंत्रज्ञान भारतात आणणारे तसेच पदवी देणारा कॅम्पस स्थापन करण्यासाठी यूजीसीची
मान्यता मिळालेले हे पहिले अमेरिकन
विद्यापीठ आहे.
शिकागो,
इलिनॉय,
अमेरिका / मुंबई, भारत — 10 फेब्रुवारी, 2026 — तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या
अमेरिकेतील अग्रगण्य संशोधन विद्यापीठांपैकी एक असलेल्या इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजीने (इलिनॉय टेक) आज मुंबईतील आपल्या नवीन कॅम्पसची घोषणा केली. विक्रोळी
येथील गोदरेज बिझनेस डिस्ट्रिक्ट येथे हा कॅम्पस असणार आहे. भारतातील सर्वात
शाश्वत आणि नावीन्यपूर्णतेवर आधारित विकसित होणाऱ्या शहरी प्रकल्पांपैकी हा एक
आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात - ऑगस्ट/सप्टेंबर मध्ये विद्यार्थ्यांच्या पहिल्या
तुकडीचा प्रवेश होणार आहे.
इलिनॉय टेकचे भारतासोबतचे दीर्घकाळचे संबंध आणि शैक्षणिक उत्कृष्टतेद्वारे
जागतिक प्रतिभेला सक्षम करण्याच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब म्हणजे
कॅम्पससाठी करण्यात आलेली मुंबईची निवड. उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम, पदव्या,
तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांसह 100हून अधिक कंपन्यांच्या मध्यभागी प्रत्यक्ष कॅम्पस स्थापित
करून अनुभवाधारित शिक्षणावर असलेल्या केंद्रावर हे विद्यापीठ जोर देते. भारतीय
उद्योगातील एक दिग्गज व्यक्तिमत्व,
माजी विद्यार्थी आणि गोदरेज अँड बॉईसचे अध्यक्ष तसेच
व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे इलिनॉय
टेकच्या या निर्णयाला एक पर्सनल टचही आहे. भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने या
वर्षीच्या सुरुवातीला देशात पदवी-प्रदान करणारा कॅम्पस स्थापन करण्यासाठी पहिले
अमेरिकन विद्यापीठ म्हणून इलिनॉय टेकला अधिकृतरित्या ऐतिहासिक मंजुरी दिल्यानंतर, जागेची निवड हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
2026च्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे
स्वागत करण्यास सज्ज असलेले मुंबईतील हे नवीन कॅम्पस, कॉम्प्युटर सायन्स,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि बिझनेस यांसारख्या जास्त मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये पदवी
आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देईल. हे कॅम्पस शिकागोमधील इलिनॉय
टेकच्या शिक्षणाची ओळख असलेल्या त्याच शैक्षणिकदृष्ट्या कठोर, अनुभवात्मक,
बहुविद्याशाखीय आणि उद्योगाशी जोडलेले असे शिक्षण देईल.
तसेच भारताच्या गतिमान अर्थव्यवस्थेत विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधी
उपलब्ध करून देईल.
कॅम्पसच्या ठिकाणी आयोजित उद्घाटन तसेच दीपप्रज्वलन समारंभानंतर ही घोषणा
करण्यात आली. यात इलिनॉय टेक आणि गोदरेज अँड बॉयस यांनी त्यांच्या सहकार्याला
औपचारिक स्वरूप देण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. समारंभानंतर, विद्यापीठातील प्रमुख व्यक्तींनी मुंबईतील एका माहिती सत्रात शाळांचे
मुख्याध्यापक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या समुपदेशकांशी संवाद साधला. यावेळी
इलिनॉय टेक मुंबईतील शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया आणि जागतिक शिक्षण मॉडेलबद्दल माहिती दिली.
प्रतीकात्मकतेसाठी,
सामर्थ्यासाठी आणि स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण
करण्यासाठी निवडलेले स्थान
इलिनॉय टेकच्या भारतासोबतच्या दीर्घकाळ संबंधांचा नैसर्गिक विस्तार म्हणजे
गोदरेज बिझनेस डिस्ट्रिक्ट. शिकागोमधील इलिनॉय टेकमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण
घेण्यासाठी जमशेद एन. गोदरेज यांनी भारत सोडल्यानंतर पाच दशकांहून अधिक काळानंतर, विद्यापीठाला मुंबईत एक कॅम्पस उभारण्याचा अभिमान वाटतो, जिथे ते जागतिक दृष्टिकोन असलेल्या प्रतिभेच्या पुढच्या पिढीला शिक्षित करतील.
इलिनॉय टेक ज्या मूल्यांसाठी ओळखले जाते, त्यांचे प्रतिनिधित्व गोदरेज डिस्ट्रिक्ट करते: नावीन्य, शाश्वतता,
संशोधन आणि समाज. जैवविविधता असलेला त्याचा राखीव प्रदेश—जी
भारतातील खासगीरित्या व्यवस्थापित केलेली सर्वात मोठी खारफुटीची परिसंस्था
आहे—यासोबतच येथील सर्वसमावेशक निवासी, आरोग्य सेवा,
शैक्षणिक आणि व्यावसायिक पायाभूत सुविधा, यांमुळे जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान-केंद्रित विद्यापीठासाठी हे एक आदर्श
स्थान ठरते आहे.
इलिनॉय टेकचे अध्यक्ष राज इचंबडी
म्हणाले की,
भारताशी धोरणात्मक दृष्टी आणि ऐतिहासिक संबंध दर्शवणारा असा
हा निर्णय आहे. “इलिनॉय टेकचे भारतासोबतचे संबंध अनेक दशकांचे आहेत, ते वैयक्तिक आहेत आणि आमच्या ध्येयाचा तोच पाया आहे,” इचंबडी म्हणाले. "आमच्या माजी भारतीय विद्यार्थ्यांनी या उद्योगांना आकार
दिला आहे,
प्रगत तांत्रिक नवकल्पना करण्यासोबतच जगभरातही वेगवेगळ्या
प्रकारे उत्तम योगदान दिले आहे. आमच्या सर्वात प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांपैकी
एक,
जमशीद एन. गोदरेज यांच्या नेतृत्वाखालील एका भागात आमचा
मुंबई कॅम्पस सुरू करणे,
हे त्या सामायिक इतिहासाच्या अर्थपूर्ण निरंतरतेचे
प्रतिनिधित्व करते. यामुळे आम्हाला नावीन्य, उद्देश आणि समाजाशी जोडलेले असे जागतिक स्तरावरील शिक्षण भारतात उपलब्ध करून
देण्याची मान्यता मिळते."
गोदरेज आणि बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे मूळ स्थान हे आधुनिक पायाभूत
सुविधा आणि मुंबईच्या कॉर्पोरेट तसेच संशोधन परिसंस्थेशी मजबूत कनेक्टिव्हिटी देते, जे STEM
शिक्षणासाठी इलिनॉय टेकच्या ऍप्लाइड आणि आंतरविद्याशाखीय
दृष्टिकोनाला समर्थन देते.
या घोषणेबाबत गोदरेज अँड बॉयसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच
इलिनॉय टेकचे पदवीधर जमशीद एन. गोदरेज म्हणाले, “इलिनॉय टेकमध्ये मिळवलेले शिक्षण आणि अनुभव हे माझे करिअर घडवण्यासाठी तसेच
गोदरेज ब्रँडच्या माध्यमातून मी निर्माण केलेला प्रभाव ठरविण्यात महत्त्वाचे ठरले.
इलिनॉय टेकने मुंबईच्या बिझनेस कॅम्पसाठी गोदरेज बिझनेस डिस्ट्रिक्टची निवड केली, याचा मला अभिमान आहे. 25+
वर्षांहून अधिक काळ विद्यापीठाच्या बोर्डावर काम केलेले
असल्याने शैक्षणिक उत्कृष्टता,
नवकल्पना आणि संधींबद्दलची अतुलनीय वचनबद्धता मी
प्रत्यक्षात अनुभवली आहे. हा क्षण त्या वारशाचे सक्षमपणे प्रतिनिधित्व करतो आणि मी
भारतातील विद्यार्थ्यांसाठी बदल घडवणाऱ्या संधींची अपेक्षा करतो.”
शैक्षणिक उत्कृष्टता आणि अनुभवात्मक शिक्षणासाठी डिझाइन केलेले कॅम्पस
सुमारे 90,000 चौरस फूट परिसरात पसरलेल्या इलिनॉय टेकच्या मुंबई
कॅम्पसमध्ये उत्तम,
अनुभवात्मक आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणाला पाठिंबा
देण्यासाठी तयार केलेल्या शैक्षणिक आणि संशोधन जागा असतील. या सुविधांमध्ये प्रगत
वर्गखोल्या,
अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल आणि भौतिक सोयींसह एक आधुनिक ग्रंथालय आणि आमच्या जागतिक कॅम्पस तसेच
सह-कार्य जागांमधील सहयोगी शिक्षणाचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना क्रीडांगणे, इनडोअर कॉम्प्लेक्स,
ॲम्फीथिएटर,
मनोरंजनाच्या इतर सुविधा, विद्यार्थी सेवा आणि शिकागो-स्थित तसेच जागतिक दर्जाच्या प्राध्यापकांकडून
मार्गदर्शन मिळेल. जे अभ्यासक्रमाचे मॉड्यूल शिकवतील, परिसंवाद आयोजित करतील आणि स्थानिक शैक्षणिक तसेच औद्योगिक भागीदारांसोबत
संयुक्त संशोधन उपक्रमांमध्ये सहभागी होतील.
प्रवेश प्रक्रिया व्यवस्थापन आणि विद्यार्थी व्यवहार विभागाचे उपाध्यक्ष मल्लिक सुंदरम म्हणाले की,
या कॅम्पसच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे भारतातील
उद्योगांच्या अपेक्षांसोबत शिक्षणाची सांगड घालण्याची इलिनॉय टेकची क्षमता अधिक
भक्कम होईल.
“गोदरेज बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये विस्तार करून, आम्ही इलिनॉय टेकला भारतातील औद्योगिक नवोपक्रमाच्या सर्वात महत्त्वाच्या
केंद्रांपैकी एकाच्या केंद्रस्थानी आणत आहोत. हे धोरणात्मक स्थान आम्हाला आमचा
वैशिष्ट्यपूर्ण 'एलिव्हेट'
उपक्रम अशा वातावरणात विस्तारण्याची संधी देतो, जिथे औद्योगिक भागीदारी भरभराटीस येऊ शकते. जो प्रत्येक विद्यार्थ्याला
वास्तविक जगातील अनुभव,
मार्गदर्शन आणि यशासाठी करिअरची तयारी याची हमी देतो.
यामुळे हे देखील सुनिश्चित होते की, भारतातील विद्यार्थी त्यांच्या स्थानिक परिसरात उच्च-मूल्याचे, उद्योगाशी संबंधित,
जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त STEM पदवी अभ्यासक्रम मिळवू शकतील, त्याच वेळी शिकागो आणि आमच्या इतर जागतिक कॅम्पसपर्यंतचे पर्यायही खुले असतील,” असे सुंदरम म्हणाले.
Comments
Post a Comment