'अर्थया एसआयएफ’ लाँच करत युनियन म्युच्युअल फंडचा स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स (एसआयएफ) क्षेत्रात प्रवेश; प्लॅटफॉर्म प्रमुखपदी राजेश आयनोर यांची नियुक्ती
'अर्थया एसआयएफ’ लाँच करत युनियन म्युच्युअल फंडचा स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स (एसआयएफ) क्षेत्रात प्रवेश; प्लॅटफॉर्म प्रमुखपदी राजेश आयनोर यांची नियुक्ती
युनियन ॲसेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने (‘युनियन एएमसी’)आज युनियन म्युच्युअल फंडतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘अर्थया एसआयएफ’च्या माध्यमातून स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) क्षेत्रात प्रवेश केल्याची घोषणा केली. इक्विटी, हायब्रिड आणि फिक्स्ड इन्कम या विभागांमध्ये उद्दिष्ट-केंद्रित आणि सक्रियपणे व्यवस्थापित गुंतवणूक धोरणे राबविण्यासाठी हाखास प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा लक्षणीय विस्तार करत, अधिक धोरणात्मक आणि परिणामाभिमुख पोर्टफोलिओ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लवचिक व सानुकूल उपाय देण्याबाबत युनियन म्युच्युअल फंडची बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होते.
संस्कृतमधील ‘अर्थ’ (संपत्ती) या शब्दावरून ‘अर्थया’ हे नाव घेतले असून त्याचा अर्थ 'उद्दिष्ट-केंद्रित संपत्ती'असा होतो. भारतीय मूल्ये आणि आधुनिक दृष्टीकोन यांची सांगड घालत आणि गुंतवणूकदारांचा आर्थिक प्रवास दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगत ठेवतउद्दिष्ट-केंद्रित संपत्ती निर्मितीचे तत्वज्ञान या नावातून प्रतिबिंबित होते.
या उपक्रमाबाबत भाष्य करताना युनियन एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मधु नायर म्हणाले, “अर्थया एसआयएफ ही पारंपरिक म्युच्युअल फंड्स आणि पीएमएस व एआयएफसारख्या उच्च मूल्याच्या पर्यायांच्या मधील वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रातील आमची प्रवेशाची पायरी आहे. यामुळे आम्हाला अधिक नेमकी, लवचिक आणि विशिष्ट गुंतवणूकदार उद्दिष्टांशी सुसंगत अशी गुंतवणूक धोरणे देणे शक्य होते. उद्दिष्ट-केंद्रित गुंतवणूक या आमच्या दृष्टिकोनाचा हा स्वाभाविक विस्तार असून, शिस्तबद्ध आणि बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घेणाऱ्या उपायांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओला पूरक पर्याय देण्याचा आमचा उद्देश आहे.”
या विभागात सखोल तज्ज्ञता उभारण्याच्या दिशेने, युनियन एएमसीने एसआयएफसाठी गुंतवणूक प्रमुख म्हणून श्री. राजेश आयनोर यांची नियुक्ती केली आहे. विविध बाजार चक्रांमध्ये टॅक्टिकल, हायब्रिड तसेच लाँग शॉर्ट धोरणांचे व्यवस्थापन करण्याचा दोन दशकांहून अधिक अनुभव राजेश यांच्याकडे आहे. या नव्या विभागात संस्थात्मक दर्जाची विचारसरणी, प्रभावी जोखीम व्यवस्थापन आणि वेगळ्या दृष्टिकोनाचा समावेश करण्याचा युनियन एएमसीचा मानस या नियुक्तीमधूनस्पष्ट होतो.
आपली भूमिका मांडताना एसआयएफसाठीचे गुंतवणूक प्रमुख श्री. राजेश आयनोर म्हणाले, “मागील काही महिन्यांपासून आम्ही गुंतवणूकदारांच्या उद्देशावर आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीवर ठाम लक्ष केंद्रित करत अर्थया एसआयएफची रचना करत आहोत. हा प्लॅटफॉर्म आम्हाला सक्रिय देखरेखीखाली उच्च विश्वासार्हतेची गुंतवणूक धोरणे उभारण्याची लवचिकता देतो, तसेच गुंतवणूकदारांच्या उद्देशाशी प्रामाणिक राहण्यास मदत करते. स्पष्टता, लवचिकता आणि सुसंगतता यांवर आमचा भर असून, केवळ परताव्यांच्या माध्यमातूनच नव्हे तर उद्दिष्टांच्या माध्यमातूनही मूल्यनिर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
युनियन एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री. हर्षद पटवर्धन यांनी पुढे सांगितले,“शिस्त, संशोधन आणि जबाबदारी यांवर आमचे गुंतवणूक तत्त्वज्ञान आधारित आहे. दीर्घकालीन विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवत अधिक जलद पद्धतीने गुंतवणूक धोरणांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देऊन अर्थया एसआयएफ या मजबूत पायाला अधिक बळकटी देतो.”
अर्थया एसआयएफ अंतर्गत पारंपरिक पोर्टफोलिओला पूरक ठरणारी, टॅक्टिकल लवचिकता आणि संरचित जोखीम व्यवस्थापन यांचा संगम असलेली विविध गुंतवणूक धोरणे सादर केली जाणार आहेत. सानुकूल ॲलोकेशन कल्पना, अधिक सक्षम पोर्टफोलिओ रचना आणि परिणामाभिमुख उपाय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करत, नियमनबद्ध आणि पारदर्शक चौकटीत सेवा देण्याचा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे.
अर्थया एसआयएफ अंतर्गत पहिली गुंतवणूक नीती आवश्यक त्या मंजुरींनंतर लवकरच सादर करण्यात येणार आहे.
या लाँचच्या माध्यमातून, संस्थात्मक अनुभवातून साकारलेल्या आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीद्वारे सादर केल्या जाणाऱ्या उद्दिष्ट-केंद्रित गुंतवणूक उपायांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना पाठबळ देण्याचे प्रयत्न युनियन म्युच्युअल फंड अधिक बळकट करत आहे.
Comments
Post a Comment