एलआयसी म्युच्युअल फंडाकडून एआय, डेटा सेंटर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मना लक्ष्य करून वैविध्यपूर्ण टेक्नॉलॉजी फंड प्रस्तुत
एलआयसी म्युच्युअल फंडाकडून एआय, डेटा सेंटर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मना लक्ष्य करून वैविध्यपूर्ण टेक्नॉलॉजी फंड प्रस्तुत
एलआयसी
म्युच्युअल फंडाने एलआयसी एमएफ टेक्नॉलॉजी
फंड प्रस्तुत करत असल्याची आज घोषणा केली. ही एक थीमॅटिक समभागसंलग्न (इक्विटी)
योजना असून, तिची रचना ही पारंपारिक आयटी सेवांच्या पलीकडे विस्तारत असलेल्या भारताच्या
तंत्रज्ञान क्षेत्राच्या विस्तृत प्रगतीपथात गुंतवणूकदारांना सहभागी करून घेण्यासाठी
करण्यात आली आहे.
योजनेचा प्रारंभिक प्रस्तुती कालावधी (एनएफओ) २० फेब्रुवारी २०२६ पासून खुला होईल आणि ६ मार्च २०२६ रोजी तो बंद होईल. ही योजना १९ मार्च २०२६ पासून निरंतर खरेदी आणि विक्रीसाठी पुन्हा खुली होईल. योजनेचे निधी व्यवस्थापन श्री. करण दोशी आणि श्री. जयप्रकाश तोष्णीवाल हे संयुक्तपणे करतील आणि बीएसई टेक टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय) या मानदंड निर्देशांकावर तिची कामगिरी बेतलेली असेल.
पारंपारिक आयटी-केंद्रित फंड प्रस्तुतीच्या विपरीत, एलआयसी एमएफ टेक्नॉलॉजी फंडाचे उद्दिष्ट हे तंत्रज्ञान-चालित क्षेत्रांच्या विस्तृत श्रेणीमध्ये भांडवलाचे वाटप करणे आहे. ज्यामध्ये सेमीकंडक्टर उत्पादनाशी संलग्न कंपन्या, डेटा सेंटरचे चालक, डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्म, इंटरनेट व्यवसाय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उपक्रमांचा समावेश आहे.
एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आर. के. झा या फंड प्रस्तुती संबंधाने म्हणाले; “सेमीकंडक्टर क्षेत्राचा विकास आणि डिजिटल पायाभूत सुविधांसाठी सरकारच्या दृढ वचनबद्धतेला २०२६-२७ केंद्रीय अर्थसंकल्पाने अधोरेखित केले आहे. भारताची तंत्रज्ञान परिसंस्था सेमीकंडक्टर फॅब्रिकेशनपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या स्वीकारापर्यंत प्रगती करत असताना, आम्ही या क्षेत्रातील सूचीबद्ध समभागांमध्ये बहु-वर्षीय संरचनात्मक संधींना खुले करत आहोत.”
एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (इक्विटी), श्री. योगेश पाटील म्हणाले; “आमचे गुंतवणूक धोरण हे तंत्रज्ञान मूल्य साखळीमध्ये शाश्वत वाढीचे चालक, निरोगी रोख प्रवाह आणि विस्तारसुलभ कार्यसंरचना असलेल्या व्यवसायांची ओळख पटवण्यावर लक्ष केंद्रित करणारे आहे. ज्याचा उद्देश हा विशिष्ट व्यवसायावर केंद्रित नव्हे तर वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान पोर्टफोलिओ तयार करणे असा आहे.”
एनएफओ दरम्यान, किमान अर्ज रक्कम १,००० रुपये आहे आणि त्यानंतर १ रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. किमान दैनिक एसआयपी रक्कम १०० रुपये आहे आणि त्यानंतर १ रुपयांच्या पटीत ती सुरू करता येईल. मासिक एसआयपी किमान २०० रुपये आहे आणि त्यानंतर ती १ रुपयांच्या पटीत, तर किमान तिमाही एसआयपी रक्कम १००० रुपये आहे आणि त्यानंतर १ रुपयांच्या पटीत असेल. एसआयपी सुरू होण्याची तारीख ही योजना निरंतर व्यवहारांसाठी पुन्हा खुली झाल्यानंतरच लागू होईल.

Comments
Post a Comment