`फिल्मसिटी'त लघु चित्रपटाचे धडे...
`फिल्मसिटी'त लघु चित्रपटाचे धडे...
‘चित्रपट कसा तयार करावा’ याविषयाच्या कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद
एफटीआयआय पुणे आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीचा उपक्रम
तरुणाईसह नागरिकांना कायम उत्कंठा असलेल्या चित्रपटसृष्टीतील चित्रपटाच्या निर्मितीचे धडे डॉ. मिलिंद दामले यांनी उपस्थितांना दिले.
पुणे येथील `फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (एफटीआयआय) व दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आलली होती. त्यात लघुपट व चित्रपटाच्या निर्मितीतील विविध टप्पे, चित्रपट साकारण्यातील कलाकार, इतर तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांची भूमिका विषद करण्यात आली. कथांमधील फरक, स्क्रिप्ट म्हणजे काय, पुस्तकाची कथा व सिनेमाची कथा आदींमधील फरक विद्यार्थ्यांना सागण्यात आले. पटकथा, कथा, संवाद आणि स्क्रिप्ट यामधील फरक डॉ. दामले यांनी सविस्तरपणे सांगितला. गाण्याचे चित्रीकरण, सेट तयार करण्याची पद्धत, वेगवेगळ्या ठिकाणांहून चित्रपटासाठी एकत्र काम करणारे कलाकार, इनडोअर व आउटडोअर पद्धतीत करावयाचे काम, प्रॉडक्शन, प्री प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन यातील फरक समजावून सांगितला.
साऊंड डिझाईन, साऊंड रेकॉर्डींग, मिक्सींग, रेकॉर्डींग, रिरेकॉर्डींग, एडीटींग, असेंब्ली आदी प्रकाराची माहिती दिली. तसेच चित्रपटाचा कमांडींग चीफ, त्याचे कार्य यांची उदाहरणांसह माहिती दिली. लघुकथा, लघु पटकथा, लघु चित्रपट, पूर्ण लांबीचा चित्रपट आदींमधील फरकाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम बेर्डे उपस्थित होते.
.jpeg)
Comments
Post a Comment