महाराष्ट्र,चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांना अभिवादन
महाराष्ट्र,चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांना अभिवादन
बर्लिन येथेही व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले अभिवादन
चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्र,चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांच्या चित्रनगरी परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, व्यवस्थापक ( कलागरे) संतोष खामकर, मुख्य सुरक्षा अधिकारी अनिल माने, फाळके यांचे कुटुंबातील सदस्य यांच्यासह चित्रनगरीचे अधिकारी-कर्मचारी, निर्माता महामंडळाचे पदाधिकारी, चित्रनगरीतील निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी हरित चित्रनगरी उपक्रमातर्गत चित्रनगरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण करून चित्रनगरी हरित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या अभ्यासदौऱ्यावर आहेत. बर्लिन येथे महामंडळाचा आकर्षक स्टॉल उभारण्यात आला असून त्याठिकाणी दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते.

Comments
Post a Comment