क्लीनमॅक्स एनव्हायरो एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ (IPO) २३ फेब्रुवारी २०२६ रोजी खुला होणार

क्लीनमॅक्स एनव्हायरो एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ (IPO) २३ फेब्रुवारी २०२६ रोजी खुला होणार, प्रति इक्विटी शेअर १००० ते १०५३ रुपये किंमतपट्टा (Price Band) निश्चित

·         प्रति इक्विटी शेअर (दर्शनी मूल्य रुपया) १००० ते १०५३ रुपये किंमतपट्टा.

·         बोली/ऑफर उघडण्याची तारीख२३ फेब्रुवारी २०२६ आणि बंद होण्याची तारीख २५ फेब्रुवारी २०२६.

·         किमान बोली (Bid Lot) १४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर १४ च्या पटीत.




भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक आणि औद्योगिक (C&I) अक्षय ऊर्जा पुरवठादार कंपनी 'क्लीनमॅक्स'ने आपल्या पहिल्या सार्वजनिक विक्रीसाठी (आयपीओ) शेअर १००० ते १०५३ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रत्येकी रुपया आहेकंपनीचा आयपीओ २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि २५ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान १४ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १४ च्या पटीत बोली लावू शकतात.

हा आयपीओ १२ कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू (Fresh Issue) आणि प्रवर्तक कुलदीप जैन, BGTF One Holdings (DIFC) Limited आणि KEMPINC LLP यांच्याद्वारे १९ कोटी रुपयांपर्यंतच्या 'ऑफर-फॉर-सेल'चा (OFS) समावेश आहे. इतर विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये Augment India I Holdings, LLC आणि DSDG Holding APS यांचा समावेश आहे.

नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या ,१२२. कोटी रुपयांचा वापर कंपनी आणि/किंवा त्यांच्या उपकंपन्यांच्या थकीत कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल. प्रस्तावित आयपीओपूर्वी कंपनीने १५०० कोटी रुपये यशस्वीरित्या उभे केले आहेत.

या कंपनीमध्ये खालील दीर्घकालीन संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग होता:

·         ​Jongsong Investments Pte. Ltd. (टेमासेक होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडची अप्रत्यक्ष मालकीची उपकंपनी)

·         ​GSS India Opportunities AIF Scheme I (बेन कॅपिटल स्पेशल सिच्युएशन्सची संलग्न संस्था)

·         ​360 ONE Special Opportunities Fund

·         ​Neo Digital Investments Limited

·         ​Steadview Capital Mauritius Limited

·         निवडक फॅमिली ऑफिसेस

जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग हा क्लीनमॅक्सच्या बिझनेस मॉडेलवर आणि भारताच्या व्यावसायिक आणि औद्योगिक अक्षय ऊर्जा क्षेत्रातील दीर्घकालीन वाढीच्या संधींवरील विश्वास दर्शवतो.

क्लीनमॅक्स ही या क्षेत्रातील सुरुवातीच्या कंपन्यांपैकी एक असून त्यांनी उद्योगाच्या उत्क्रांतीत आणि ऑपरेटिंग मॉडेल्सला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओपैकी सुमारे ४३% भाग डेटा सेंटर आणि AI ग्राहकांसाठी आहे. भारतात डेटा सेंटर्स आणि AI पायाभूत सुविधा वेगाने विस्तारत असल्याने, शाश्वत ऊर्जा समाधानांची मागणी वाढत आहे, जी क्लीनमॅक्ससाठी मोठी बाजारपेठ आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM