उबरने भारत व दक्षिण आशियामध्ये गाठला १ अब्जाहून अधिक राइड्सचा टप्पा
  उबरने भारत व दक्षिण आशियामध्ये गाठला १ अब्जाहून अधिक राइड्सचा टप्पा   १ अब्जाचा टप्पा गाठणारी पहिली ट्रिप बेंगळुरुमध्ये   त्याचवेळी मुंबई ,  हैद्राबाद व दिल्लीमध्ये इतर ६ ट्रिप्सचे देखील बुकिंग       जगातील सर्वात मोठी राइड शेअरिंग कंपनी उबरने भारत व दक्षिण आशिया प्रांतामधील १ अब्जाहून अधिक राइड्ससह आणखी एक सुवर्ण टप्पा गाठला .  पाच वर्षांपूर्वी उबरने बेंगळुरूमधून भारतात आपल्या सेवेचा शुभारंभ केला होता आणि याच शहरामध्ये ही अब्जोचा टप्पा गाठणारी ट्रिप घेण्यात आली .  त्याचवेळी मुंबईमध्ये एक ,  हैद्राबादमध्ये दोन आणि दिल्लीमध्ये तीन अशा सहा इतर ट्रिप्सचे देखील बुकिंग करण्यात आले .   या सुवर्ण टप्प्याबाबत बोलताना उबर भारत व दक्षिण आशियाच्या राइड्स विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन म्हणाले , '' हा भारत व दक्षिण प्रांतासोबतच संपूर्ण उबर परिवारासाठी अत्यंत उत्साही व लक्षणीय टप्पा आहे .  हा १ अब्जाचा टप्पा म्हणजे उबरसारखे तंत्रज्ञान शहरी प्रवासाच्या भवितव्याला परिभाषित करू शकते याचा पुरावा आहे .  आम्ही या प्रां...
