दीपा झवेरी‘मिसेस इंडिया अर्थ क्लासिक’ स्पर्धेच्या विजेत्या
दीपा झवेरी‘मिसेस इंडिया अर्थ क्लासिक’ स्पर्धेच्या विजेत्या
मुंबई : नुकत्याच संपन्न झालेल्या ‘मिसेस इंडिया अर्थ २०१९’ या स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रांमधील कित्येक महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे विजेतेपद सामाजिक कार्यकर्ता आणि स्टँड-अप कॉमेडियन दीपा झवेरी यांनी पटकावले. दीपा झवेरी म्हणतात, “माझ्या किशोरवयीन मुलीने मला सांगितले की, ‘आई तुझ्याकडे दिझायनर कपडे नाहीत. तुझा फॅशन सेन्स अगदीच जुना आहे. तू खूप दिलखुलास नाहीस. तू फारतर अंतिम १५मध्ये येशील...’ आज मी ‘मिसेस इंडिया अर्थ क्लासिक २०१९’ स्पर्धेची विजेती झाली आहे. माझे कपडे रॅक किंवा काही स्थानिक डिझाईन स्टुडीओमध्ये पडले होते. मी माझ्या स्टँड-अप कॉमेडीने सर्वांना आकर्षित करत ‘मोस्ट स्टायलिस्ट दिवा’ पुरस्कार पटकावला आणि मी माझ्या मुलीचे म्हणणे चुकीचे असल्याचे सिद्ध केले. या सन्मानाचा प्रवास खूप मोठा आहे. केवळ कॉमेडी करून ही स्पर्धा जिंकणे शक्य नव्हते आणि मी तयारीही केली नव्हती.”
कोणत्याही ब्रँडेड चपला, डिझायनर लेबल किंवा फॅन्सी मेकओव्हर मी केला नाही. माझ्यासमोरील प्रत्येक स्पर्धक हा परिपूर्ण होता. मी मात्र प्रत्येक फेरीत उत्साहात होते आणि क्षमतेप्रमाणे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन मी करेन, असे मी ठरवून टाकले होते. या काळात मी प्रेक्षकांना गाणी आणि नृत्याने खूप हसवले आणि ही सौंदर्यस्पर्धा जिंकणारी मी पहिली स्टँड-अप कॉमेडीयन ठरले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेची सर्वांनाच प्रतीक्षा होती. मी ‘अंतिम १५’ मध्ये निवडली गेले आणि त्यानंतर ‘अंतिम ३’ मध्ये माझी निवड झाली... त्यानंतर मग ‘मिसेस इंडिया अर्थ २०१९’च्या ‘क्लासिक क्वीन’ मुकुटाची मी विजेती ठरले. त्याशिवाय ‘स्टायलिश दिवा’ या किताबासाठीही माझी निवड झाली, असेही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणतात, “योग आणि चिंतनाने मला शांत ठेवले आणि त्याद्वारे मी संपूर्ण स्पर्धेमध्ये लक्ष केंद्रित केले. माझ्या कुटुंबातील माझ्याबरोबर कोणी सोबत आले नव्हते. त्यामुळे गरजेच्या प्रसंगी मदत होईल असे माझ्याजवळ कोणीच नव्हते. पण एक हास्यकलाकार म्हणून कोणत्याही व्यासपीठावर आपली कला प्रदर्शित करण्यासाठी मी ओळखली जात असल्याने प्रत्येक प्रसंगासाठी मी तत्पर होते. मी अंतिम परिणाम काय असतील याची काळजी केली नाही.” या अनुभवाबद्दल बोलताना दीपा म्हणल्या, “हा एक शानदार असा अनुभव आणि यादगार अशी अनुभूती होती. पुढे जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा प्रत्येक स्पर्धकाला मी प्रोत्साहित करेन. यातून मी बरेच काही शिकले आहे. ही स्पर्धा काही बाह्य सौंदर्याबद्दल नव्हती, तर ही स्पर्धा ही तुमची अधिक खोलवर परीक्षा घेणारी होती आणि खूपच आव्हानात्मक होती. खरे पहिले तर एखाद्या स्पर्धक विजेत्याची खरी जबाबदारी ही शो पूर्ण झाल्यानंतर सुरु होते.”

Thank you for this beautiful write up 👍🏻
ReplyDelete