युनियन बँक ऑफ इंडियाचे आर्थिक निकाल जाहीर
युनियन बँक ऑफ इंडियाचे आर्थिक निकाल जाहीर आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १८ , ६९७ कोटी रुपयांचा नफा युनियन बँक ऑफ इंडिया च्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही व आर्थिक वर्ष २०२६ चे आर्थिक निकाल जाहीर केले. बँकेने मजबूत व्यवसाय वाढ , कमी झालेले एनपीए आणि भक्कम भांडवली गुणोत्तर यामुळे सकारात्मक कामगिरी नोंदवली आहे. बँकेने प्रति इक्विटी शेअर ५ रुपये (फेस व्हॅल्यू १० रुपयांच्या ५० टक्के) लाभांश देण्याची शिफारस केली आहे. यासाठी आवश्यक मंजुरी मिळणे बाकी आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये बँकेचा निव्वळ नफा १८ , ६९७ कोटी रुपये झाला. व्याज उत्पन्न १ , ०५ , ९९२ कोटी रुपये इतके नोंदवले गेले. बँकेचा एकूण व्यवसाय ५.७८ टक्क्यांनी वाढून २३ , ८५ , ५०२ कोटी रुपयांवर पोहोचला असून ग्रॉस अॅडव्हान्सेसमध्ये ९.७४ टक्के वाढ झाली तर ठेवींमध्ये २.७२ टक्के वाढ झाली. ३१ मार्च २०२६ पर्यंत बँकेच्या एकूण ठेवी १३ , ०६ , ८९१ कोटी रुपये झाल्या आहेत. बँकेच्या आरएएम सेगमेंटमध्ये १२.५६ टक्के, रिटेल अॅडव्हान्सेसमध्ये १६.७५ टक्के तर एमएसएमई अॅडव्हान्सेसमध्ये १८.७५ टक्के वाढ झाली आहे. डोमेस्टिक अॅडव्हान्सेसमध्ये ...