टेकमसेहने भारतात ग्लोबल टेक्नोलॉजी सेंटरचे उद्घाटन केले
टेकमसेहने भारतात ग्लोबल टेक्नोलॉजी सेंटरचे उद्घाटन केले
नवोन्मेषकारी
व्यावसायिक रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची
कंपनी टेकमसेहने भारतात आपल्या अत्याधुनिक ग्लोबल टेक्नोलॉजी सेंटरचे अधिकृतरित्या
उद्घाटन केले. या केंद्रामुळे
टेकमसेहच्या अमेरिका, फ्रान्स आणि
ब्राझिलमधील इंजिनीअरिंग लॅब्जच्या नेटवर्कमध्ये नवीन भर पडली आहे. याद्वारे टेकमसेहने आपल्या अत्याधुनिक
कॉम्प्रेसर्स व मूल्यवर्धित सिस्टम सोल्युशन्समधील जागतिक स्तरावरील संशोधन व
विकासासाठीच्या गुंतवणुकीत आणखी वाढ केली आहे.
हे
केंद्र स्थापन करण्यासाठी दिल्लीजवळील ठिकाण विशिष्ट
धोरणाने निवडण्यात आले आहे. या
भागात डिझाइन व उत्पादन कारखाने असलेल्या अन्य जागतिक दर्जाच्या तसेच आघाडीच्या
ओईएम ब्रॅण्ड्ससोबत भागीदारी व सहयोग दृढ करण्यासाठी या स्थळाची निवड करण्यात आली
आहे.
टेकमसेहचे
अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉग मर्डोक फीत कापण्याचा समारंभ झाल्यानंतर
म्हणाले, “आमच्या इंजिनीअरिंग
क्षमतांचा भारतात विस्तार करून आम्ही उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या कूलिंग
सोल्युशन्सप्रती तसेच शाश्वत तंत्रज्ञानांप्रती मानत असलेली बांधिलकी दाखवून देत
आहोत.” श्री. मर्डोक पुढे म्हणाले, “आमचे नवीन केंद्र आघाडीच्या ओईएम
ग्राहकांपासून जवळ तर आहेच, शिवाय
इंजिनीअरिंगमधील सर्वोत्तम प्रतिभेचा समावेश आमच्या केंद्रात करण्यासाठी हे ठिकाण
उत्तम आहे. हे केंद्र आमच्या
जागतिक उत्पादनांसाठी तसेच ग्राहकांसाठी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या तसेच डिझाइन
करण्याच्या प्रक्रियेत योगदान देईल. त्याचप्रमाणे
हे करत असताना रोजगार निर्माण करून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मदत करेल.”
टेकमसेह
इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जेगप्रियन गोविंदराजन म्हणाले, “टेकमसेहने भारतात १९९७पासून काम सुरू केले
आहे तेव्हापासून आम्ही स्थानिक ग्राहक व भागीदारांच्या आवश्यकता पूर्ण करणारी
उत्पादने पुरवणारी उद्योगक्षेत्रातील आद्य कंपनी राहिलो आहोत.” ते पुढे म्हणाले, “नवीन ग्लोबल टेक्नोलॉजी सेंटर स्थानिक
इंजिनीअरिंग प्रतिभेचा लाभ घेऊन जगभरातील ग्राहकांना उपयुक्त ठरतील अशी उत्क्रांत
होत जाणारी उत्पादने विकसित करेल. ही
उत्पादने वेगाने बदलणाऱ्या बाजारपेठेच्या गरजा व औद्योगिक निर्बंधांची पूर्तता
करणारी असतील.”

Comments
Post a Comment