फ्लेम (FLAME) विद्यापिठाची २०२० शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू


फ्लेम (FLAME) विद्यापिठाची २०२० शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू
भारतात उदारमतवादी शिक्षण धोरणात अग्रेसर असलेल्या फ्लेम विद्यापिठाने २०२०च्या शैक्षणिक वर्षासाठीच्या पदवी व पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया सुरू करत असल्याची घोषणा केली आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम
फ्लेम विद्यापिठात तीन वर्षांचा बीएम, बीए* (ऑनर्स), बीएससी, बीबीए आणि बीबीए (कम्युनिकेशन व्यवस्थापन) हे अभ्यासक्रम पदवीसाठी उपलब्ध आहेत. यंदापासून बीएससी* (ऑनर्स) हा पदवी अभ्यासक्रमही पोर्टफोलियोमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. भारतात उच्च शिक्षणात क्रांती घडवून आणण्याच्या प्रयत्नातून फ्लेम विद्यापिठात उदारमतवादी शिक्षणपद्धती राबवण्यात येत आहे.
अर्थशास्त्रातील बीए पदवीसह अर्थशास्त्रातील बीए (ऑनर्स) अभ्यासक्रमही उपलब्ध करण्यात आला आहे.
** संगणक विज्ञान विषयात बीएससी (ऑनर्स) अभ्यासक्रम उपलब्ध होत आहे.
फ्लेम विद्यापिठातील पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी पर्यायी चौथ्या वर्षाचा लाभ घेऊन फ्लेम स्कॉलर्स उपक्रमात सहभागी होऊ शकतात. या अभ्यासक्रमात संशोधन हा अविभाज्य भाग आहे.
या व्यतिरिक्त, फ्लेम विद्यापिठात दोन वर्षांचे एमबीए आणि एमबीए (कम्युनिकेशन व्यवस्थापन) हे पदव्युत्तर अभ्‍यासक्रम राबवण्यात येतात. विद्यापिठाचा एमबीए अभ्यासक्रम सीएफए विद्यापिठीय मान्यता अभ्यासक्रमांतर्गत संमत आहे.
फ्लेमची निवड का करावी?
भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या संदर्भात अत्यंत दुर्मिळ असलेली २५०हून अधिक लहान-मोठी कॉम्बिनेशन्स पदवी अभ्यासक्रमासाठी फ्लेम विद्यापिठात उपलब्ध आहेत.
देशात या विद्यापिठाचा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी हे गुणोत्तर सर्वोत्कृष्ट असून ९:१ हे गुणोत्तर भारतात उच्च शिक्षणासाठीचे सर्वोत्तम गुणोत्तर आहे. ९० हून अधिक दर्जेदार पूर्णवेळ प्राध्यापकवर्ग येथे उपलब्ध असून जगभरातील सर्वांत प्रसिद्ध व दर्जेदार शिक्षणसंस्थांशी विद्यापिठाची भागीदारी आहे. त्यामुळे या विद्यापिठात अद्वितीय शिक्षणानुभव विद्यार्थ्यांना घेता येतो.
प्रवेशप्रक्रिया
पदवी अभ्यासक्रमासाठी फ्लेम विद्यापिठात एसएटी वा एसीटी परीक्षांतील गुण मान्य केले जात असून त्याऐवजी एफईएटी ही विद्यापिठाची स्वतःची स्वतंत्र प्रवेश परिक्षाही राबवण्यात येऊ शकते. फ्लेम विद्यापिठात पुढील शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरणाऱ्या सर्वोत्कृष्ट गुणांकन मिळवलेल्या विद्यार्थ्यांची निवड एसएटी, एसीटी, एफईएटी यांतील गुण, प्रबंध, व्यक्तीगत मुलाखती, पूर्वीची शैक्षणिक पार्श्वभूमी, अभ्यासबाह्य उपक्रम व शिक्षण घेण्यामागचा हेतू या निकषांवर करण्यात येते.
फ्लेम विद्यापिठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड सीएटी, एक्सएटी, एमएटी, सीएमएटी, जीमॅट व एमएच-सीईटी यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांतील गुण तसेच, पर्यायी स्वतंत्र पडताळणी परीक्षा (पीजी - एफईएटी), प्रबंध, व्यक्तीगत मुलाखती, पूर्वीची शैक्षणिक पार्श्वभूमी, अभ्यासबाह्य उपक्रम व शिक्षण घेण्यामागचा हेतू या निकषांवर करण्यात येते.
शिष्यवृत्त्या
फ्लेम विद्यापिठांतर्गत अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जात असून या माध्यमातून अंतर्गत उत्कृष्टतेला आणि विद्यार्थ्यांमधले अंतर्गत गुणांना प्रोत्साहन दिले जाते. या माध्यमातून फ्लेम विद्यापिठात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आकर्षित होतील, याची खात्री बाळगली जाते.
याव्यतिरिक्त, मेरिटनुसार, गरजेनुसार आणि विशेष शिष्यवृत्त्याही विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असून या अंतर्गत शिक्षणशुल्कात अंशतः वा पूर्ण सवलत मिळू शकते.
फ्लेम विद्यापिठाबाबत
भारतात फ्लेम विद्यापीठ हे स्वायत्त किंवा उदारमतवादी शिक्षणपद्धती राबवणारे अग्रेसर विद्यापीठ असून या विद्यापिठातर्फे देशात इंटरडिसीप्लिनरी शिक्षणानुभव दिला जातो. भारतातील सर्वांत आदरणीय व प्रसिद्ध विद्याकेंद्रांपैकी हे एक विद्यापीठ असून विद्यार्थी व शिक्षकांना देशातच दर्जेदार उच्च शिक्षण देणारे हे उत्तम विद्यापीठ आहे. या विद्यापिठाच्या मदतीने शिक्षणाची प्रक्रिया व दर्जा रुंदावण्यात तसेच, स्वायत्त शिक्षण व नेतृत्व क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाची परिभाषा बदलण्यासाठी मदत होते.
सतत नवीन काही शिकून स्वतःची प्रगती साधण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना फ्लेम विद्यापीठ बरेच पर्याय उपलब्ध करून देत असून नवीन कल्पनांचे येथे नेहमीच स्वागत केले जाते. यशस्वी होण्याच्या इच्छाशक्तीसह वैविध्याला विद्यापिठात विशेष महत्व देण्यात येत असून सर्वच क्षेत्रात उत्कृष्टता मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन पुरवले जाते.  
विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात दृष्टीकोन विकास, जनसंपर्कपूरक कौशल्य व पात्रता, समस्या निवारण कौशल्य, कल्पकता, संशोधन, सांघिकता आणि मूल्यशिक्षणाचा अंतर्भाव असून देशाच्या विविध क्षेत्रांच्या गरजा पुरवणारे हे अभ्यासक्रम आहेत. ९० हून अधिक पूर्णवेळ प्राध्यापकांसह हे विद्यापीठ अद्वितीय शिक्षणानुभव प्रदान करते. देशात या विद्यापिठाचा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी हे गुणोत्तर सर्वोत्कृष्ट असून ९:१ हे गुणोत्तर भारतात उच्च शिक्षणासाठीचे सर्वोत्तम गुणोत्तर आहे. ६० एकर परिसरात पसरलेले हे विद्यापीठ सौंदर्यात्मक दृष्टीकोनातून स्थापन करण्यात आले असून या कॅम्पसमध्ये सध्या फ्लेम स्कूल ऑफ कम्युनिकेशन, फ्लेम स्कूल ऑफ लिबरल एज्युकेशन, फ्लेम स्कूल ऑफ बिझनेस आणि फ्लेम स्कूल ऑफ फाईन अॅण्ड परफॉर्मिंग आर्टस् ही चार शिक्षणकेंद्रे आहेत.
फ्लेम विद्यापिठाची स्थापना राज्यस्तरीय खासगी विद्यापीठ म्हणून करण्यात आली असून महाराष्ट्र सरकारच्या फ्लेम विद्यापीठ कायदा २०१४ (महाराष्ट्र कायदा क्रमांक २ - २०१५) नुसार आखणी करण्यात आली आहे. विद्यापीठ मान्यता समितीमार्फत (यूजीसी) अंतर्गत या विद्यापिठाला सेक्शन २ (फ)ची मान्यता मिळाली असून विद्यापिठातर्फे देण्‍यात येणाऱ्या पदव्या यूजीसी कायदा, १९५६ अंतर्गत २२व्या सेक्शनमध्ये मान्य करण्यात येतात. 

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

KidZania Partners with Meetakriti Art Studio to Launch Creative Pottery & Art Role-Plays for Kids