उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची उल्हासनगरमध्ये ७००वी शाखा सुरू
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची उल्हासनगरमध्ये ७००वी शाखा सुरू ९ बँकिंग आऊटलेट्स लाँच, देशभरात बँकेच्या आता एकूण ७०२ शाखा उल्हासनगर, ३१ जुलै, २०२२-: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आज ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील त्यांच्या उल्हासनगर शाखेचे उदघाटन केल्याची घोषणा केली. बँकेने ९ शाखांचे उदघाटन केल्याने त्यांच्या देशभरातील एकूण शाखांची संख्या आता ७०२ वर गेली आहे.७०० व्या शाखेचे उद्घाटन उत्कर्ष स्मॉल फायनान्स बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .गोविंद सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यासह, बँकेच्या २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या देशातील २२५ जिल्ह्यांमध्ये आता एकूण ७०२ शाखा झाल्या आहेत. उल्हासनगरमध्ये या शाखेचा शुभारंभ विविध वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी बँकेच्या धोरणाशी सुसंगत आहे.यामध्ये घाऊक कर्ज, सूक्ष्म बँकिंग कर्ज (जेएलजी कर्ज), एमएसएमई कर्ज, गृह कर्ज, मालमत्तेवरील कर्ज, व्यावसायिक वाहन कर्ज, व्यावसायिक वाहने आणि बांधकाम उपकरणे कर्ज आणि चालू आणि बचत खाती, मुदत आणि आवर्ती ठेवी, विमा आणि सुवर्ण कर्ज आणि आमच्या ग्राहकांसाठी गुंतवणूक उत्प...