`पीएनजी ज्वेलर्स'तर्फे 'बाय नाऊ, पे लेटर' ही नवीन मोहिम सादर

 `पीएनजी ज्वेलर्स'तर्फे 'बाय नाऊ, पे लेटर' ही नवीन मोहिम सादर


मुंबई 14जुलै २०२२ : पीएनजी ज्वेलर्स तर्फे बाय नाऊ, पे लेटर ही नवीन मोहीम भारतातील निवडक दालनांमध्ये सुरू करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पनवेल, नागपूर, बारामती, अहमदनगर, चंद्रपूर, औरंगाबाद आणि नांदेड येथील 'पीएनजी ज्वेलर्स'च्या दालनांमध्येे या मोहिमेअंतर्गत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
या ऑफरद्वारे, ग्राहक आता त्यांची खरेदी व्याजमुक्त सुलभ मासिक हप्त्यांमध्ये सुरक्षित करू शकतील! सर्व प्रकारच्या खरेदीदारांना खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. पहिल्यांदाच सोने खरेदी करणार्‍यांसाठी ही मोहीम विशेष महत्त्वाची आहे. कारण यामुळे त्यांना त्यांची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करता येणार आहे.

याप्रसंगी बोलताना 'पीएनजी ज्वेलर्स'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, आमच्या ग्राहकांचा आनंद द्विगुणित करणे हेच ध्येय समोर ठेवून त्यांना आमच्यासोबत जोडून राहण्यासाठी अनेक पर्याय आणि संधी देण्याचा सतत प्रयत्न आम्ही करत असतो. यावेळी ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी मासिक सुलभ हफ्ता असणारी ही मोहीम घेऊन आलो आहोत. या मोहिमेमुळे इच्छुक खरेदीदारांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खर्च न करता या महिन्यात त्यांची नियोजित/अनियोजित खरेदी करण्यासाठी सोयीस्कर ठरेल.

भारतभरातील व जगभरातील ग्राहकांनी आम्हाला गेली १८८ वर्षे सहकार्य करत आमच्याशी नाते दृढ केले आहे. त्यांच्या या विश्‍वासामुळेच त्यांच्याकरिता काहीतरी अधिक करण्याच्या हेतूने अनिश्‍चिततेच्या काळात आवश्यक त्या ऑफर्स आम्ही घेऊन येत असतो. त्यांना आवश्यक असलेली खरेदी अनिश्‍चिततेमुळे चुकू नये, हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या ग्राहकांशी असलेले दृढ नाते आणि त्यांच्याकडून मिळालेले सहकार्यासाठी आम्ही ही मोेहीम ग्राहकांसाठी सुरू केली आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार