महाराष्ट्रात नजीकच्या भविष्यात 50,000 स्टार्टअप्सना चालना मिळणार – उदय सामंत, उद्योग मंत्री
महाराष्ट्रात नजीकच्या भविष्यात 50,000 स्टार्टअप्सना चालना मिळणार – उदय सामंत, उद्योग मंत्री मुंबई, 27 जून – महाराष्ट्र सरकार सातत्याने स्टार्ट अप क्षेत्राला बळ देत असून नजीकच्या भविष्यात स्टार्टअप्सची संख्या 50,000 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारने एमएसएमईपासून मोठ्या कॉर्पोरेट्सपर्यंत सर्वांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले असल्याचे माननीय श्री. उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र सरकार यांनी असोचॅमच्या कार्यक्रमात जाहीर केले. असोचॅम महाएमएसएमईराष्ट्र एम्पॉवरमेंट समिट अँड अवॉर्ड्स 2024 मध्ये संबोधताना श्री. सामंत म्हणाले, ‘केंद्रीय सरकारने नुकतीच गेल्या दोन वर्षांतील स्टार्ट- अप्सची यादी जाहीर केली असून त्यापैकी 8,300 स्टार्ट- अप्स महाराष्ट्रातील आहेत. यामुळे स्टार्टअप्सच्या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्य सरकार या घडामोडींविषयी सकारात्मक असून भविष्यात ही संख्या 50,000 वर नेण्याचे उद्दिष्ट आहे.’ ‘स्टार्टअप्स लाँच झाल्यानंतर त्याचे काम सुरू आहे, की बंद झाले यावर देखरेख करत राहाणं महत्त्वाचे आहे. स्टार्टअप्सच्या स्थितीचे विश्लेषण आणि त्य...