स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजीची आयपीओ ऑफर 6 जानेवारी 2025 पासून, प्राईस बँड रु. 133/- ते रु. 140/- जाहीर
स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजीची आयपीओ ऑफर 6 जानेवारी 2025 पासून, प्राईस बँड रु. 133/- ते रु. 140/- जाहीर स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी समभाग विक्रीची खुली आयपीओ ऑफर सुरु करण्याची घोषणा केली आहे. बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी ही खुली ऑफर गुंतवणुकीसाठी बंद होईल. कंपनीने या आयपीओ ऑफरमध्ये प्रतिसमभाग प्राईस बँड रु. 133/- ते रु. 140/- असेल अशीही घोषणा केली आहे. कंपनीच्या आयपीओ दरम्यान विक्रिस असलेल्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू रु. 10/- ठेवण्यात आले आहे. इच्छुक गुंतवणूकदार किमान 107 समभागाच्या एका लॉट साठी व त्यापुढे 107 समभागांच्या पटीत शेअरखरेदीसाठी बीड करु शकतील. स्टँडर्ड ग्लास लायनिंग कंपनीचा हा पहिलाच आयपीओ आहे. आयपीओमध्ये फ्रेश म्हणजे नवे शेअर व कंपनी प्रमोटर समुहाद्वारा विक्रीस काढण्यात आलेल्या ऑफर ऑफ सेल समभागांचा समावेश आहे. त्यानुसार फ्रेश इश्यू अंतर्गत रु. 210/- कोटींचे शेअर तर ऑफर ऑफ सेल अंतर्गत 1,42,89,367 समभाग विक्रीस उपलब्ध आहेत. कंपनी फ्रेश इश्यूमधून उभ्या होणाऱ्या भांडवलातून रु. 10/- कोटी मशिन...