क्योरफूड्स इंडिया लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी
क्योरफूड्स इंडिया लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी क्योरफूड्स इंडिया लिमिटेड ही ग्राहक पसंती आणि आहार गरजांना पूरक अशा व्यापक खाद्यपदार्थांची सेवा पुरविणारी इंटरनेट आधारित मल्टी - ब्रँड फूड सर्व्हिसेस कंपनी आहे . कंपनीने आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस ( डीआरएचपी ) मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) यांच्याकडे दाखल केले आहे . 31 मार्च 2025 पर्यंतच्या स्थितीनुसार , क्योरफूड्स ही आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ऑपरेशन्समधून मिळालेल्या महसुलाच्या आधारे ( फूड डिलिव्हरी मार्केटप्लेस वगळून ) भारतातील दुसऱ्या क्रमांकाची डिजिटल - फर्स्ट फूड सर्व्हिसेस कंपनी आहे . ही ऑफर ₹1 दर्शनी मूल्याच्या नवीन शेअर्सच्या इश्यूमधून एकूण ₹8,000.00 मिलियन इतकी रक्कम उभारणाऱ्या “ नवीन इश्यू ” चा आणि 48,537,599 इक्विटी शेअर्सच्या “ ऑफर फॉर सेल ” चा समावेश करते . या ऑफर फॉर सेलमध्ये आयर्न पिलर पीसीसी ( आयर्न पिलर पीसीसी – सेल सी आणि सेल ई यांच्या वतीने ) कडून 19,08...