मार्क्वार्टने भारतातील अस्तित्व केले अधिक बळकट

तळेगाव येथे नवीन उत्पादन प्रकल्प सुरू मार्क्वार्टने भारतातील अस्तित्व केले अधिक बळकट • वेगाने वाढणाऱ्या बाजारात भांडवली गुंतवणूक • मेकॅट्रॉनिक प्रणालींसाठी उत्पादन क्षमता विस्तारली • 2030 पर्यंत सुमारे 300 नवीन रोजगार संधी मेकॅट्रॉनिक्स क्षेत्रातील अग्रणी मार्क्वार्टने भारतातील उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तळेगाव (पुणे) येथे नव्या उत्पादन प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या नवीन सुविधेसह या कुटुंब व्यवस्थापित कंपनीने आपल्या पूर्वीच्या मुंबईतील उत्पादन केंद्राऐवजी तळेगावमधील केंद्र सुरू केले असून उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. यामुळे बदलत्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी कंपनीची क्षमता वाढली आहे. या प्रकल्पासाठी इमारत, यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये 180 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. भविष्यात, या अत्याधुनिक प्रकल्पातून भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी मेकॅट्रॉनिक सिस्टीम सोल्युशन्सचे उत्पादन करण्यात येणार आहे. मार्क्वार्ट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्योर्न ट्वेहाउस (Björn Twi...