एमजी मोटरची २०१९ पर्यंत देशभरात १३० दालने उघडण्याची योजना
एमजी मोटरची २०१९ पर्यंत देशभरात १३० दालने उघडण्याची योजना एमजी मोटर इंडियाने (मॉरिस गॅरेजेस) आज भारतीय बाजारपेठेकरिता आक्रमक व्यवसाय योजनांची घोषणा केली. देशात विस्तार करण्याच्या योजनेच्या आपल्या पहिल्या टप्प्यात एमजी मोटर इंडियाची २०१९ पर्यंत १३० दालने उघडण्याची योजना असून २०२२ पर्यंत ३०० हून अधिक केंद्रे उभारण्याचा त्यांचा मानस आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतातील संचालनासाठी एमजी मोटर इंडिया येत्या ५ ते ६ वर्षात भारतीय बाजारपेठेत ५००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. सध्या ते आपला हालोल येथील प्लान अपग्रेड करत आहेत ज्यामध्ये एक प्रेस शॉपचे बांधकाम, असेम्ब्ली लाईन्स व इतर सुविधांचे रीटूलिंग सामील आहे. येत्या पाच वर्षात ४ ते ५ मॉडेल्स लॉन्च करण्यासह २०२३ पर्यंत २००,००० गाड्या विकण्याचे ध्येय आहे. देशात पहिला डीलरशिप सोहळा आयोजित करून एमजी मोटर इंडियाने भारतीय बाजारपेठेशी असलेली आपली वचनबद्धता आणखी दृढ केली. या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील आपल्या संचालनासाठी योग्य भागीदारांची निवड करणे हा होता. ११ मार्च २०१८ रोजी प्रवेशिका सुरू झाल्यापासून त्यांच्या संकेतस्...