रुग्णांच्या नव्या लाटेमुळे युरोवर करडी नजर
रुग्णांच्या नव्या लाटेमुळे युरोवर करडी नजर (लेखक: श्री. वकारजावेद खान, रिसर्च अॅनलिस्ट, एंजल ब्रोकिंग लिमिटेड) २०२० या वर्षाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत युरो आणि अमेरिकन डॉलर या जोडीमध्ये ६.१९ टक्क्यांची वाढ झाली असून युरो आणि रुपाया या जोडीत जवळपास ८.९३ टक्क्यांची घसरण झाली. दरम्यान याच काळात डॉलरच्या निर्देशांकात ३.५८ टक्क्यांची घट झाली. असे असले तरीही, सध्याच्या काळात प्रमुख युरो ब्लॉक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची दुसरी लाट आल्यामुळे युरोचे मूल्य काही प्रमाणात घटले आहे. यामुळे युरोपच्या आर्थिक सुधारणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्पेन आणि फ्रान्स हे युरोपमधील नवे हॉटस्पॉट ठरले: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे युरोपमधील प्रमुख भागाला हादरा बसला असून यापैकी स्पेन आणि फ्रान्सला अधिक गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.. फ्रान्समध्ये दररोज सुमारे १०,००० पेक्षा जास्त रुग्ण निघत असून स्पेननेही एकूण ६,००,००० ची रुग्णसंख्या ओलांडली आहे. शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये स्पेनच्या आरोग्य अधिका-यांनी १,२०,००० संसर्गांचे निदान केले असून तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाणह...