मुंबई पोलीसांना जैन इरिगेशतर्फे फेशशिल्ड
मुंबई पोलीसांना जैन इरिगेशतर्फे फेशशिल्ड दि. 29 प्रतिनिधी -* कोरोना योद्धा म्हणून सदैव कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांना जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीने उत्तम गुणवत्तेचे फेशशिल्ड व हॅण्ड सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. मुंबईमधील दक्षिण मुंबई पोलीस स्टेशनच्या सुमारे 100 च्यावर फ्रंड लाईन पोलीस कर्मचाऱ्यांना फेशशिल्डचे वाटप झाले. परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त शशिकुमार मिना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. दक्षिण मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा होडगे यांच्याहस्ते जैन इरिगेशनच्या फेशशिल्ड व हॅण्ड सॅनिटायझर वाटप करण्यात आले