कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने लॉन्च केला स्ट्रायकर माको नवी मुंबईमध्ये सर्वात प्रगत ऑर्थो रोबोट
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने लॉन्च केला स्ट्रायकर माको नवी मुंबईमध्ये सर्वात प्रगत ऑर्थो रोबोट 31 जानेवारी 2023, नवी मुंबई: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने आपल्याकडील पहिली रोबोटिक-आर्म असिस्टेड सर्जिकल सिस्टिम स्ट्रायकर माकोचे क्लिनिकल लॉन्च करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सांधे प्रत्यारोपण सर्जरीसाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या सर्वात प्रगत ऑर्थो-रोबोटिक तंत्रज्ञानांपैकी हे एक तंत्रज्ञान आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईचे कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक्स डॉ सुभाष धिवरे यांनी आपल्या टीमसह या नवीन रोबोटिक सिस्टिमचा उपयोग करून दोन केसेसवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. यूएस एफडीएने मान्यता दिलेल्या माको रोबोटिक सिस्टिममुळे खुबा, गुडघा यांचे संपूर्ण प्रत्यारोपण तसेच गुडघ्याचे आंशिक प्रत्यारोपण ज्या पद्धतीने केले जाते त्यामध्ये मोठी क्रांती घडवून आणली आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई हे सांधे प्रत्यारोपणासाठी सर्वात प्रगत तंत्रज्ञान, माको रोबोटिक सिस्टिम्स असलेले नवी मुंबईतील पहिले रुग्णालय आहे. जगभरात ५००,०००...