पाइन लॅब्स लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक विक्री ऑफर (IPO) ७ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडणार
पाइन लॅब्स लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक विक्री ऑफर ( IPO) ७ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडणार प्रति समभाग किंमत पट्टा ₹ २१० ते ₹ २२१ निश्चित पाइन लॅब्स लिमिटेड यांनी जाहीर केले की , समभागांच्या प्रारंभिक सार्वजनिक विक्रीची तारीख शुक्रवार , ७ नोव्हेंबर २०२५ असेल. यात कंपनीकडून नवीन समभाग जारी करून २० , ८०० रुपये दशलक्ष पर्यंत निधी उभारला जाईल (फ्रेश इश्यू) तसेच विद्यमान भागधारकांकडून ८ , २ , ३४८ , ७७९ समभाग विक्रीसाठी उपलब्ध असतील (ऑफर फॉर सेल). किंमत पट्टा रुपये २१० ते रुपये २२१ प्रति समभाग (अंकित मूल्य रु.१) आहे. कर्मचारी सवलत म्हणजे पात्र कर्मचाऱ्यांना कर्मचारी आरक्षण भागात २१ रुपये प्रति समभाग सवलत आहे. किमान बोली ६७ समभाग असून त्यानंतर ६७ च्या पटीत असेल. अँकर गुंतवणूकदार बोली गुरुवार , ६ नोव्हेंबर २०२५ रोजी आहे. ही ऑफर शुक्रवार , ७ नोव्हेंबर २०२५ असून मंगळवार , ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होणार आहे. या निधीचा वापर कर्ज फेडणे/पूर्वपेमेंट, सिंगापूर , मलेशिया , UAE येथील उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक, IT संसाधने , क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर , डिजिटल चेक-आउट पॉइंट्स...