कुसुमगार लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) ८ जुलै २०२६ रोजी खुला

कुसुमगारचा आयपीओ  जुलै २०२६ रोजी खुला 

प्रति इक्विटी शेअर्ससाठी ३९८/- ते ४१९/- रुपयांचा प्राईस बँड निश्चित

 

·         प्रति इक्विटी शेअर (दर्शनी मूल्य प्रत्येकी रुपया) प्राईस बँड ३९८/- ते ४१९/- रुपये निश्चित

·         बिड/ऑफर सुरू होण्याची तारीख - ०८ जुलै, २०२६ आणि बिड/ऑफर बंद होण्याची तारीख - १० जुलै, २०२६.

·         किमान बिड लॉट ३५ इक्विटी शेअर्सचा आहे आणि त्यानंतर ३५ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.



कुसुमगार लिमिटेडने आपल्या पहिल्या इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) साठी प्रत्येकी /- रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी ३९८/- ते ४१९/- रुपयांचा प्राईस बँड निश्चित केला आहे. ​कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (“आयपीओकिंवाइश्यू) वर्गणीसाठी (सबस्क्रिप्शन) जुलै २०२६ रोजी खुला होईल आणि १० जुलै, २०२६ रोजी बंद होईल. ​गुंतवणूकदार किमान ३५ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३५ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली (बिड) लावू शकतात. ​आजच्या तारखेनुसार कंपनीचे एकूण १०४,९९१,३७२ इक्विटी शेअर्स (प्रत्येकी रुपया दर्शनी मूल्य) बाजारात उपलब्ध (आउटस्टँडिंग) आहेत. हा आयपीओ ६५० कोटी रुपयांचा 'ऑफर-फॉर-सेल' (OFS) आहे.

ही ऑफर बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे दिली जात आहे, ज्यामध्ये निव्वळ ऑफरच्या ५०% पेक्षा जास्त हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव नसेल, तर निव्वळ ऑफरचा अनुक्रमे १५% आणि ३५% पेक्षा जास्त हिस्सा बिगर-संस्थात्मक बिडर्स (NII) आणि किरकोळ वैयक्तिक बिडर्ससाठी (Retail) नियुक्त केला आहे.

कंपनीने आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी . कोटी रुपयांचे शेअर्स राखीव ठेवले आहेत, ज्यांना अंतिम इश्यू किमतीवर प्रति शेअर ३९ रुपयांची सूट मिळेल. ​आर्थिक वर्ष २४ मधील ४६७. कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २६ मध्ये कंपनीचे ऑपरेशन्समधून मिळणारे उत्पन्न ६९२ कोटी रुपये होते. ​आर्थिक वर्ष २४ मधील ८४. कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २६ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा ९८. कोटी रुपये होता.

ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॅडव्हायझर्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे रजिस्ट्रार आहेत.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

KidZania Partners with Meetakriti Art Studio to Launch Creative Pottery & Art Role-Plays for Kids