Posts

Showing posts from May, 2026

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने फायनान्शिअल वर्ष २०२६ मध्ये नोंदवले सर्वोच्च नफा

Image
  पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने फायनान्शिअल वर्ष २०२६ मध्ये नोंदवले सर्वोच्च नफा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) समूहाने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. समूहाचा एकत्रित नफा करानंतर (पीएटी) दहा टक्क्यांनी वाढून ३०५१४ कोटी रुपयांवरून ३३६२५ कोटी रुपये झाला आहे. पीएफसी समूह देशातील सर्वात मोठा एनबीएफसी समूह म्हणून कायम राहिला असून, त्याची एकूण बॅलन्स शीट १२ लाख ४० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. समूहाची एकूण निव्वळ संपत्ती (नॉन-कंट्रोलिंग इंटरेस्टसह) १२ टक्क्यांनी वाढून १५५१५६ कोटी रुपयांवरून १७३४४१ कोटी रुपये झाली आहे. सक्रिय पुनर्वसन प्रयत्नांमुळे एकत्रित सकल नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (ग्रॉस एनपीए) १.६४ टक्क्यांवरून ०.६६ टक्क्यांवर आले आहेत. तर निव्वळ एनपीए ०.३८ टक्क्यांवरून ०.१३ टक्क्यांवर घसरला असून, हा आतापर्यंतचा सर्वात कमी स्तर आहे. स्टँडअलोन कामगिरीतही विक्रमी नफा पीएफसी कंपनीने स्वतंत्र स्तरावर सर्वाधिक वार्षिक नफा करानंतर नोंदवला आहे. तो १७३५२ कोटी रुपयांवरून १६ टक्क्यांनी वाढून २००५१ कोटी रुपये झाला आहे. यासह पीएफसी भारतातील सर्वाधिक नफा कमावणारी एनबीएफस...