लेझर पॉवर अॅन्ड इन्फ्राचा आयपीओ ९ जुलैपासून सुरु
लेझर पॉवर अॅन्ड इन्फ्राचा आयपीओ ९ जुलैपासून सुरु
लेझर पॉवर अॅन्ड इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या समभागांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरची (आयपीओ) माहिती जाहीर करण्यात आली आहे. यातील किंमत बँड प्रति समभाग रु. २०३ ते रु. २१४ इतका निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक समभागाचे अंकित मूल्य रु. ५ आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीदार तारीख बुधवार, जुलै ८, २०२६ असेल. बोली/ऑफर उघडण्याची तारीख गुरुवार, जुलै ९, २०२६ तर बोली/ऑफर बंद होण्याची तारीख सोमवार, जुलै १३, २०२६ असेल. बोली कमीत कमी ७० समभागांसाठी आणि त्यानंतर ७० समभागांच्या गुणाकारात करता येईल.
या ऑफरमध्ये नवीन समभाग जारी करून रु. ५४२० कोटींपर्यंत निधी उभारला जाईल. तसेच प्रोमोटर विक्रेते समभागधारकांकडून रु. २००० कोटींपर्यंत समभाग विक्रीसाठी ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. ऑफर फॉर सेलमध्ये दीपक गोयल यांच्याकडून रु. ११२५ कोटी, राखी गोयल यांच्याकडून रु. २५० कोटी आणि देवेश गोयल यांच्याकडून रु. ६२५ कोटी पर्यंत समभाग विक्रीचा समावेश आहे.
कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे सूचीबद्ध करण्यात येणार आहेत. आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड) आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Comments
Post a Comment