‘कथा सांगण्याची आवड’ या विषयावरील संवाद सत्रात तरुण चित्रपट निर्मात्यांनी उलगडली आपल्यापुढील आव्हाने
‘कथा सांगण्याची आवड’ या विषयावरील संवाद सत्रात तरुण चित्रपट निर्मात्यांनी उलगडली आपल्यापुढील आव्हाने (अशोक रा. शिंदे यांजकडून) गोवा/मुंबई, 25 नोव्हेंबर 2023 : नवीन चित्रपट निर्माते रोज नवनवीन पायंडा पाडत आहेत, ताज्या, खोलवर रुजलेल्या आणि नव-कल्पनेनी सजलेले नवीन सिनेमा ते बनवत आहेत. मात्र, सिनेमाची भाषा नव्याने परिभाषित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये, तरुण चित्रकर्मींनी आपला आवाज ऐकला जावा यासाठी भयंकर अडथळ्यांची मालिका पार करायला हवी. 54 व्या इफ्फी मध्ये आयोजित केलेल्या संभाषण सत्राने, आपण ज्या चित्रपटांची प्रशंसा करतो, ते बनवणाऱ्या तरुण चित्रपट निर्मात्यांना त्यांचा संघर्ष, आव्हाने आणि चित्रपट बनवण्यातील आनंद याबाबतचे विचार मांडायला एक व्यासपीठ प्रदान केले. कन्नड चित्रपटावर लक्ष केंद्रित करून दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे चित्रपट निर्माते सागर पुराणिक यांनी आपला बाल कलाकार ते कथाकथानकार हा प्रवास उलगडला. चांगल्या भूमिकेची वाट पाहणे सोडून, आपण आकर्षक कथानक सांगण्याकडे कसे वळलो, हे सांगताना ते म्हणाले की, आजचे चित्रपट निर्माते सर्व प्रकार...