मेक इन इंडियाला बळ! आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान
मेक इन इंडियाला बळ! आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान मुंबई: भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी 'आरआरपी डिफेन्स लिमिटेड'आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी 'ईएससी बाज' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. * 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. * आर्टिफिशियल इंटेलिजन्स...