Posts

फूड लिंक एफ अँड बी होल्डिंग्जचा ₹361 कोटींचा IPO 26 नोव्हेंबर रोजी खुला होणार; किंमत पट्टा ₹181-191 निश्चित

Image
  फूड लिंक एफ अँड बी होल्डिंग्जचा ₹361 कोटींचा IPO 26 नोव्हेंबर रोजी खुला होणार; किंमत पट्टा ₹181-191 निश्चित लक्झरी फूड सर्व्हिसेस क्षेत्रातील कंपनी फूड लिंक एफ अँड बी होल्डिंग्ज (इंडिया) लिमिटेड आपल्या पहिल्या सार्वजनिक समभाग विक्रीद्वारे (IPO) ₹361 कोटी उभारण्याच्या तयारीत आहे. हा IPO 26 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार असून, प्रति समभाग किंमत पट्टा ₹181-191 निश्चित करण्यात आला आहे. सोमवारी करण्यात आलेल्या सार्वजनिक घोषणेनुसार, हा IPO 30 नोव्हेंबर रोजी बंद होईल, तर अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया 25 नोव्हेंबर रोजी पार पडेल. या सार्वजनिक इश्यूमध्ये ₹192 कोटींपर्यंतच्या इक्विटी समभागांचा फ्रेश इश्यू आणि विद्यमान भागधारकांकडून 88,35,382 इक्विटी समभागांची ₹168.76 कोटींपर्यंतची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. किंमत पट्ट्याच्या वरच्या स्तरावर एकूण इश्यूचा आकार ₹360.76 कोटी इतका असेल. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार, फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निधीचा वापर एक नवीन केंद्रीकृत किचन आणि दोन नवीन बँक्वेट्स उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. याशिवाय, चार नवीन ...

भावनांच्या वैश्विक भाषेतून सिनेमा मानवतेला एकत्र बांधतो : कार्ला सोफिया गॅस्कॉन

Image
  भावनांच्या वैश्विक भाषेतून सिनेमा मानवतेला एकत्र बांधतो : कार्ला सोफिया गॅस्कॉन (अशोक रा. शिंदे यांजकडून) गोवा ः सिनेमा भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून मानवी भावनांच्या वैश्विक भाषेच्या माध्यमातून लोकांना एकमेकांशी जोडतो, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेत्री कार्ला सोफिया गॅस्कॉन यांनी केले. गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीअंतर्गत (IFFI - International Film Festival of India) आयोजित स्टेजेस अक्रॉस बॉर्डर्स (सीमांपलिकडचे रंगमंच) या विशेष मास्टरक्लास दरम्यान त्या बोलत होत्या. या मास्टरक्लास दरम्यान गॅस्कॉन यांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्आयाचे आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले. नवोदित कलाकारांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, आपल्या व्यक्तित्वाचा स्वीकार करावा आणि आपल्या कलेप्रती निष्ठा बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. अस्सल अभिनय सादर करण्यासाठी आपल्या कलेवर निस्सीम प्रेम असणे अत्यंत गरजेचे असते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. अभिनयाबद्दलचा आपला दृष्टिकोनही त्यांनी यावेळी मांडला. पडद्यावर अस्सलपणा आणण्यासाठी गहिऱ्या भावनिक गुंतवणुकीच्या आध...

भाषा आणि सीमांच्या पलीकडे : 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी अंतर्गत इंडियन पॅनोरमा विभागाच्या माध्यमातून भारतीय सिनेमा जगतातील वैविध्याचा गौरव

Image
  भाषा आणि सीमांच्या पलीकडे : 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी अंतर्गत इंडियन पॅनोरमा विभागाच्या माध्यमातून भारतीय सिनेमा जगतातील वैविध्याचा गौरव (अशोक रा. शिंदे यांजकडून) गोवा ः देशाच्या दक्षिणेकडच्या टोकाकडील प्रदेशांपासून ते ईशान्य भारतापर्यंत, भारतीय सिनेमाला आपल्या कथा, संस्कृती आणि सर्जनशील अभिव्यक्तींच्या विलक्षण वैविध्यातून बळ मिळत आले आहे. असे असले तरी, प्रादेशिक ओळख आणि चित्रपट शैलींच्या पलीकडे पाहीले तर, परस्पर सामायिक मानवी भावनांच्या माध्यमातूनच या कथा देशभरातील प्रेक्षकांशी  जोडल्या जात असतात. चित्रपटकर्मी मधुर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखालील इंडियन पॅनोरमा 2026 या विभागातील कथात्मक चित्रपटांच्या निवड समितीने आज मांडलेल्या अनुभवांमधूनही याच वैविध्याचे प्रतिबिंब उमटले. गोव्यात सुरू असलेल्या 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीअंतर्गत (IFFI - International Film Festival of India) आयोजित पत्रकार परिषदेत या निवड समितीने 404 प्रवेशिकांमधून 25 चित्रपटांची निवड करण्याच्या प्रक्रियेतला आपला अनुभव आज सर्वांसमोर मांडला. यावेळी मधुर...

57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा 2026 चे उद्घाटन; ज्युरी सदस्यांचा सत्कार

Image
  57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा 2026 चे उद्घाटन;  ज्युरी सदस्यांचा सत्कार (अशोक रा. शिंदे यांजकडून)  गोवा ः गोव्यातील पणजी येथे 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फीत) इंडियन पॅनोरमा 2026 चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. इंडियन पॅनोरमा 2026 चे उद्घाटन करताना, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीपासूनच्या उल्लेखनीय विविधतेवर प्रकाश टाकला. त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, चित्रपट महोत्सव हा देशातील प्रत्येक प्रदेश आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा, संस्कृती आणि कथांद्वारे कसे योगदान देतो, हे ओळखण्याची एक अर्थपूर्ण संधी देतो. विचारपूर्वक केलेल्या निवडीबद्दल परीक्षक मंडळाचे, तसेच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल गोवा सरकार आणि महोत्सव चमूचे अभिनंदन करून, त्यांनी भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर सतत ओळख मिळत राहो यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी, या वर्षीच्या अधिकृत निवड प्रक्रियेतील योगदानाबद्दल फीचर आणि नॉन-फीचर चित्रपट ज्युरींच्या प्रतिष्ठित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ज्युरी सदस्यांचा सत्का...

57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी अंतर्गत 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमाच्या सहाव्या पर्वाचे उद्घाटन

Image
  57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी अंतर्गत  'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमाच्या सहाव्या पर्वाचे उद्घाटन (अशोक रा. शिंदे यांजकडून) गोवा ः 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा (IFFI - International Film Festival of India) एक भाग असलेल्या 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमाच्या सहाव्या पर्वाचे आज गोव्यातील कला अकादमी इथे उद्घाटन झाले. हा उपक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरु केला असून, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने (NFDC) हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत यंदा देशभरातील 100 युवा सर्जनशील प्रतिभा एकत्र आल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून या प्रतिभांना परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारी, त्यांच्या कौशल्याचे सादरीकरण आणि चित्रपट उद्योगक्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठीचे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उद्घाटन सोहळ्याला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (FTII) कुलसचिव लौकिक पारख, माहि...

गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्या हस्ते प्रकाशन विभागाच्या दालनाचे उद्घाटन

Image
  गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्या हस्ते प्रकाशन विभागाच्या दालनाचे उद्घाटन (अशोक रा. शिंदे यांजकडून) गोवा ः गोव्यात सुरु असलेल्या 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी मध्ये आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्या हस्ते प्रकाशन विभागाच्या दालन क्रमांक 24 चे उद्घाटन झाले. प्रकाशन विभागाच्या महासंचालक कांचन प्रसाद याप्रसंगी  उपस्थित होत्या.   यंदा गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचे 57 वे पर्व संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील आणि जगभरातील चित्रपटकर्मी, चित्रपटप्रेमी, चित्रपट उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक आणि प्रतिनिधी एकत्र आले आहेत. या आयोजनाअंतर्गत दालन क्रमांक 24 हे प्रकाशन विभागाचे दालन आहे. या दालनात देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास, कला, सिनेमा, साहित्य आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या इतर विषयांवरील पुस्तके आणि प्रकाशनांचा वैविध्यपूर्ण संग्रह मांडण्यात आला आ...

एक जग, असंख्य कथा, अनंत भावना : 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीसाठी गोवा रेड कार्पेटने सज्ज

Image
  एक जग, असंख्य कथा, अनंत भावना :  57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीसाठी गोवा रेड कार्पेटने सज्ज * चित्रपटांच्या निर्मितीपासून तो पूर्णत्वाला नेणारे केंद्र अशी गोव्याची ओळख निर्माण करायची आहे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उलगडला गोव्याचा चित्रपटविषयक दृष्टिकोन *  सत्य, भावना आणि प्रभावी कथानक कायमच प्रेक्षकांना भावते : खासदार आणि अभिनेता रवी किशन * कथा कोणत्याही पासपोर्टशिवाय सीमा ओलांडू शकते : महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर * सिनेमा हे भारताच्या सॉफ्ट पॉवर अर्थात कला आणि सांस्कृतिक सामर्थ्याचे सर्वात प्रभावी माध्यम : माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार * भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 च्या निमित्ताने सीमाविरहित संगीताचा सोहळा, रिकी केज यांनी छेडली जागतिक सुरावटीची तार (अशोक रा. शिंदे यांजकडून)  गोवा ः प्रकाशाच्या पहिल्या कवडशापासून ते पडद्यावरील पहिल्या फ्रेमपर्यंतच्या प्रवासात जगाला एकत्र येण्याचे काहीएक कारण नक्कीच सापडते. आणि आज गोवा अशाच प्रकारचे जग बनला आहे. अरबी समुद्रातल्या सोनेरी लाटांच्या पार्श्वभूमीवर गोव्याने पुन्हा एकदा...