गो एअरतर्फे 28 अतिरिक्त विमाने

गो एअरतर्फे 28 अतिरिक्त विमाने
·         26 एप्रिल 2019 पासून उड्डाणे सुरू, प्रवाश्यांकडे असणार अनेक फ्लायस्मार्ट पर्याय
·         12 डेस्टीनेशन्सची कनेक्टिव्हिटी विकसित
·         मुंबई (8 विमाने), दिल्ली (7), नागपूर (3), अहमदाबाद (2), गोवा (1), चंडीगड (1), रांची (1), जयपूर (1), लखनऊ (1), पटणा (1), पुणे (1) आणि कोची (1)
·         अतिरिक्त विमानांमुळे विमानांच्या कमतरतेवर मात करता येणार असून जेट एअरवेजची विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाश्यांना होणारा त्रासही कमी होणार आहे.
·         26 एप्रिल 2019 पासून मुंबईत जी8 2000 ते जी8 2999 या क्रमांकाची विमाने टर्मिनल 2 वरून प्रवासाला सुरूवात व सांगता करतील.
·         दिल्ली-नागपूर-दिल्ली आणि दिल्ली-कोची-दिल्ली या मार्गांवर प्रथमच गो एअरची नवीन उड्डाणे
गो एअर या भारतातील जलद वाढत जाणाऱ्या विमानसेवा कंपनीने आज अतिरिक्त 28 उड्डाणांची घोषणा केली असून या माध्यमातून ग्राहक प्रवाश्यांना कंपनीतर्फे अनेक फ्लायस्मार्ट पर्याय देण्यात येणार आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात 26 एप्रिल 2019 पासून 12 डेस्टीनेशन्ससाठी प्रवासी गो-फॉ-मोअरचा आस्वाद घेऊ शकतात. मुंबई (8 विमाने), दिल्ली (7), नागपूर (3), अहमदाबाद (2), गोवा (1), चंडीगड (1), रांची (1), जयपूर (1), लखनऊ (1), पटणा (1), पुणे (1) आणि कोची (1) अशी विमानांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून या 28 विमानांतून संपूर्ण देश कव्हर करण्यात आला आहे. जेट एअरवेजच्या रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमुळे प्रवाश्यांना होणारा त्रास व विमानांच्या कमतरतेची अडचण यामुळे त्वरित भरून निघणार आहे.
अतिरिक्त विमानांच्या सादरीकरणाबाबत बोलताना गो एअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जे वाडिया म्हणाले, आमच्या सध्याच्या विमानांसोबतच यंदाच्या उन्हाळ्यात अतिरिक्त 28 विमाने सादर करताना गो एअरला खूप आनंद होत आहे. गो एअरतर्फे प्रथमच दिल्ली-नागपूर-दिल्ली आणि दिल्ली-कोची-दिल्ली या नव्या मार्गावर विमानसेवा सुरू केली असून गो एअरतर्फे ग्राहकांना त्यांनी मोजलेल्या पैशाच्या तोडीची सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. काही ठराविक मार्गांवरील आमच्या विमानसेवेचा दर 1368 रुपयांपर्यंत कमी ठेवण्यात आला आहे. प्रवाश्यांना सुरक्षित व सक्षम दळणवळण सेवा पुरवण्यासाठी गो एअर सदैव तत्पर असते. आमच्या परिचालक सक्षमतेमुळे सलग सात महिने गो एअर कंपनी ऑन टाईम परफॉर्मन्स (ओटीपी)मध्ये प्रथम क्रमांकावर आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
मुंबईत, 26 एप्रिल 2019 पासून जी8 2000 ते जी8 2999 या क्रमांकांची विमाने टर्मिनल 2 वरून उड्डाण घेतील व उतरतील.
गो एअरची अतिरिक्त 28 विमाने -
अनु क्रमांक
विमान क्रमांक
निघण्याचे ठिकाण
उड्डाणाची वेळ
पोहोचण्याचे ठिकाण
पोहोचण्याची वेळ
सेवेचे प्रमाण
1
जी 8-2505
अहमदाबाद
13:50
मुंबई
15:20
रविवार व्यतिरिक्त रोज
2
जी 8-2604
अहमदाबाद
13:00
मुंबई
14:20
रविवार व्यतिरिक्त रोज
3
जी 8-2502
मुंबई
5:45
रांची
8:15
दररोज
4
जी 8-2504
मुंबई
11:55
अहमदाबाद
13:20
रविवार व्यतिरिक्त रोज
5
जी 8-2603
मुंबई
10:55
अहमदाबाद
12:30
रविवार व्यतिरिक्त रोज
6
जी 8-2506
मुंबई
16:30
चंडीगड
19:00
दररोज
7
जी 8-2601
मुंबई
6:40
नागपूर
8:15
दररोज
8
जी 8-2508
मुंबई
23:59
दिल्ली
2:10
दररोज
9
जी 8-2605
मुंबई
15:05
गोवा
16:30
दररोज
10
जी 8-2607
मुंबई
18:50
जयपूर
20:45
दररोज
11
जी 8-2501
दिल्ली
2:40
मुंबई
4:55
दररोज
12
जी 8-2509
दिल्ली
6:40
लखनऊ
8:00
दररोज
13
जी 8-2515
दिल्ली
7:00
नागपूर
8:35
दररोज
14
जी 8-2519
दिल्ली
19:15
नागपूर 
20:55
दररोज
15
जी 8-2511
दिल्ली
11:30
पटणा
13:20
दररोज
16
जी 8-2513
दिल्ली 
16:35
पुणे
18:50
दररोज
17
जी 8-2517
दिल्ली
11:45
कोची
14:55
मंगळवार व्यतिरिक्त रोज
18
जी 8-2606
गोवा
17:00
मुंबई
18:10
दररोज
19
जी 8-2507
चंडीगड 
19:45
मुंबई
23:25
दररोज
20
जी 8-2503
रांची
8:45
मुंबई
11:15
दररोज
21
जी 8-2608
जयपूर
21:15
मुंबई
23:20
दररोज
22
जी 8-2510
लखनऊ
8:30
दिल्ली 
9:50
दररोज
23
जी 8-2602
नागपूर
8:50
मुंबई
10:10
दररोज
24
जी 8-2516
नागपूर
9:10
दिल्ली
10:50
दररोज
25
जी 8-2520
नागपूर
21:25
दिल्ली
23:10
दररोज
26
जी 8-2512
पटणा
13:50
दिल्ली
15:30
दररोज
27
जी 8-2514
पुणे 
19:20
दिल्ली
21:30
दररोज
28
जी 8-2518
कोची
15:25
दिल्ली
18:30
मंगळवार व्यतिरिक्त रोज
सर्व स्थानिक वेळा.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार