CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार

  CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार

·       किंमतपट्टा: ₹१० दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी१०७ – ₹११३ निश्चित करण्यात आला ("इक्विटी शेअर्स").


·       बिड/इश्यू : बुधवार, २४ जून २०२६ रोजी खुला होईल आणि सोमवार, २९ जून २०२६ रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टरसाठी बिडिंगची मंगळवार, २३ जून २०२६ असेल.


·       किमान बोली : किमान १३२ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १३२ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येऊ शकते.



CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या (आयपीओ) संदर्भात आपली बिड / इश्यू बुधवार, २४ जून २०२६ रोजी खुली करेल आणि सोमवार, २९ जून २०२६ रोजी बंद करेल या इश्यूपूर्वी आणि आजच्या तारखेपर्यंत१० दर्शनी मूल्य असलेले ,८७,०२,४७२ इक्विटी शेअर्स आऊटस्टॅडिंग आहेत या इश्यूमध्ये१० दर्शनी मूल्य असलेल्या ,२९,०१,००० पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या 'फ्रेश इश्यू'चा (Fresh Issue) समावेश आहे.

 ताज्या इश्यूमधून मिळणारा निधी कंपनीच्या खेळत्या पुंजीच्या (working capital) गरजा पूर्ण करण्यासाठी, कंपनीने घेतलेल्या ठराविक थकीत कर्जाची पूर्ण किंवा अंशतः पूर्वपेमेंट किंवा परतफेड करण्यासाठी, अनिश्चित संपादन (unidentified acquisitions) आणि इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे अजैविक वृद्धी (inorganic growth) साध्य करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (एकत्रितपणे, "इश्यूचे उद्दिष्ट" किंवा “Object of Issue”) वापरला जाईल 'कीनोट फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड' (Keynote Financial Services Limited) हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर 'केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड' (KFin Technologies Limited) हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

 हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या १७ जून २०२६ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस ("RHP") नुसार जारी केले जात आहेत, जे कटक येथील कंपन्यांचे रजिस्ट्रार, ओरिसा ("RoC"), आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("SEBI") कडे १९ जून २०२६ रोजीच्या आरएचपीच्या शुद्धीपत्रकासह (corrigendum) दाखल केले गेले आहे. हे शेअर्स बीएसई लिमिटेड ("BSE") आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("NSE", एकत्रितपणे "स्टॉक एक्सचेंजेस") वर सूचीबद्ध (list) करण्याचे प्रस्तावित आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात