लिगूचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश, स्टायलिश स्मार्टफोन्सची सिरीज सादर


लिगूचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश, स्टायलिश स्मार्टफोन्सची सिरीज सादर


एस आणि एम सिरीजच्या सादरीकरणासाठी ब्रॅण्डची 
इनोव्हेटिव्ह आयडियल्स अँड सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडशी भागीदारी

चीनस्थित लिगू या अग्रेसर मोबाईल उत्पादक कंपनीने आज भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा करून एस व एम सिरीजमधील स्टायलिश स्मार्टफोन्स भारतीयांसाठी घेऊन येत असल्याचे जाहीर केले. इनोव्हेटिव्ह आयडियल्स अण्ड सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या भारतातील सर्वात अनुभवी इलेक्ट्रॉनिक सुरक्षा सोल्यूशन्स पुरवठादार कंपनीशी या ब्रॅण्डने नव्या सादरीकरणासाठी भागीदारी केली आहे. इनोव्हेटिव्ह मजबूत वितरण आणि रिटेलर्सच्या नेटवर्कसह भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) आणि आयसीटी (माहिती व संपर्क तंत्रज्ञान) उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची लेगूची योजना आहे. या माध्यमातून मोबाईल-सेगमेण्ट उद्योगक्षेत्रात अग्रेसर राहण्याचा कंपनीचा मानस आहे.

स्मार्टफोन्सच्या खूप चांगल्या रेंजसह लिगूच्या भव्य उत्पादन केंद्रात दररोज 50,000 हून अधिक फोन्सची निर्मिती करण्याची क्षमता आहे. तसेच, त्यांच्या कल्पकतापूर्ण तंत्रज्ञान व संशोधन-विकास केंद्राच्या साथीने एस 11, एम 12 आणि एम 13 या स्मार्टफोन्सचे भारतीय बाजारपेठेत सादरीकरण करून यशोगाथा पुढे सुरू ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. एस सिरीज फ्लॅगशीप व्हॅरियण्ट म्हणून सादर करण्यात आली असून एम व्हॅरियण्टचा उल्लेख फॅशनेबल फूल-स्क्रीन स्मार्टफोन म्हणून केला जात आहे.
नव्या सादरीकरणाबाबत बोलताना लिगूचे वरीष्ठ परिचालन अधिकारी श्री. केविन लियू म्हणाले, इनोव्हेटिव्ह आयडियल्स अण्ड सर्व्हिसेस लिमिटेडच्या साथीने अखेर भारतीय बाजारपेठेत प्रवेश करताना आम्हाला फार आनंद होत आहे. चीनप्रमाणेच भारतीय बाजारपेठही भव्य आणि डायनॅमिक असून या बाजारपेठेत अनेक नव्या संधी उपलब्ध आहेत. म्हणूनच, भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची ही योग्य वेळ आहे. ग्राहकांच्या बदललेल्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन आम्ही एस आणि एम सिरीजमधील किफायतशीर स्मार्टफोन्स सादर करीत आहोत. सभ्यता आणि दर्जेदार निवड यांचा मेळ असलेल्या भारतीय लोकांच्या खास जीवनशैलीशी सुसंगत स्मार्टफोन्स आम्ही तयार केले आहेत. लिगू हा ब्रॅण्ड भारतात अधिक लोकप्रिय करण्यासाठी ग्राहकांची मने जिंकण्याकरिता इनोव्हेटिव्ह कंपनीसोबत आम्ही खूप चांगले काम करणार आहोत.
याबाबत बोलताना इनोव्हेटिव्ह आयडियल्स अण्ड सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक श्री. मक्सूद शेख म्हणाले, आम्ही लिगूशी भागीदारी करून खूप आनंदी आहोत आणि भारतीय बाजारपेठेत आम्ही त्यांचे स्वागत करतो. भारतीय ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आमच्या दृष्टीने कायमच महत्वाचे राहिले असून भारतीय युजर्ससाठी लेगू हा उत्तम ब्रॅण्ड आहे. या क्षेत्रात 25 वर्षे पूर्ण केल्यानंतर, केवळ व्यापारवृद्धी साधणे हे आमचे ध्येय नाही, तर ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने व सेवा देणे हे आमचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. लेगूची नवीन कल्पकता आणि संशोधन तसेच, आमच्याकडील वितरण कौशल्यासह, भारतीय ग्राहकांची मने जिंकून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न आम्ही लिगूशी केलेल्या भागीदारीतून करणार आहोत.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार