फिक्की फूड वर्ल्ड इंडिया २०१९
खाद्य प्रक्रिया उद्योगाच्या सुरूवातीसाठी सरकार तर्फे उद्योजकांना आणि नवोदित व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यात येणार- खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली भारत सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. रामेश्वर तेली यांनी सांगितले की भारतातील खाद्यप्रक्रिया उद्योग हा देशांतील सर्वांत वाढत्या क्षेत्रांपैकी एक असून या क्षेत्रामध्ये वाढीसाठी उज्ज्वल भवितव्य आहे. फिक्की फूड वर्ल्ड इंडिया २०१९ या फिक्की आणि भारत सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांनी सहकार्यातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री तेली पुढे म्हणाले “ आमचे बजेट हे १४०० कोटी रूपयांचे असून खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून उद्योजक आणि तरूण व्यावसायिकांना खाद्य प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य तर मिळेलच पण त्याच बरोबर दुर्गम भागात उद्योग सुरू करण्यास अधिक सहकार्य केले जाईल.” श्री तेली यांनी उद्योगांना आणि व्यावसायिकांना देशाच्या उत्तरपूर्व भागात गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले. “ सरकार तर्फे गुंतवणूकदार आणि उद्योजका...