साथीच्या आजाराचा धोका वाढल्याने सोन्याचे दर वाढले
साथीच्या आजाराचा धोका वाढल्याने सोन्याचे दर वाढले मुंबई, ३० जून २०२०: अर्थव्यवस्थेत मंदी येऊ नये याची काळजी घेतानाच कोरोनाच्या रुग्णांमधील वाढ कशी नियंत्रणात येईल, हे जागतिक स्तरावरील सरकारांचे एकमेव उद्दिष्ट आहे. जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांसमोर कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेची भीती कायम आहे. सोन्याच्या किंमतींवरही याचा परिणाम होत असून सोमवारी स्पॉट गोल्डचे दर ०.०५ टक्के असे काही प्रमाणात वाढून १७७१.५ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. विषाणूभोवतीचा तणाव वाढत असल्याने सामान्य स्थितीत परतण्याच्या आशा खालावत आहेत. यामुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याचे दर वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. शून्याजवळ फिरणा-या व्याजदराव्यतिरिक्त मध्यवर्ती बँकांनी व्यवहार्य आणि प्रत्यक्ष प्रोत्साहनपर पॅकेज जाहीर केल्यामुळे पिवळ्या धातूचे दर वाढण्यास मदत झाली आहे. तसेच अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्याने इतर चलनधारकांना सोने महाग होते व यामुळे त्याच्या आणखी दरवाढीवर मर्यादा येतात. स्पॉट सिल्व्हर चे दर ०.६२ टक्क्यांनी वाढून ते १...