मदर्स रेसिपीचा देसी शेझवानसह सॉस श्रेणीत प्रवेश

 मदर्स रेसिपीचा देसी शेझवानसह सॉस श्रेणीत प्रवेश


इंडो-चायनीज फ्यूजन सॉस शेझवान चटणी हा भारतातील किचनचा महत्वाचा भाग बनला आहे. शेझवान चटणी फक्त मसाला म्हणून उपयोगात आणण्यासाठी मर्यादित राहिलेली नाही. ही चवदार बहुमुखी चटणी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये स्वाद आणते आणि घरातील स्वयंपाकांना फ्यूजन स्वादांचा प्रयोग करण्यास मदत करते. मदर्स रेसिपीने 'रेसिपी’ नावाच्या उपश्रेणी अंतर्गत ‘देसी शेझवान चटणी’ सादर केली आहे, जी आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ आणि जागतिक पाककृतीमध्ये ब्रँडच्या प्रवेशास चिन्हांकित करते. "इंडिया चायनीज, हॉट अँड बीबीक्यू सॉसेस मार्केट आउटलुक, २०२३" च्या अहवालानुसार भारतातील चिनी, हॉट आणि बार्बेक्यू सॉसेसची एकूण बाजारपेठ २०२२-२३ मध्ये ७०० कोटींपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. वेगवेगळ्या पाककृतींबद्दल ग्राहकांची वाढती पसंती, किरकोळ वापरामध्ये वाढ, सॉसची सहज उपलब्धता आणि अशा अनेक कारणांमुळे, २०११-१२ ते २०१६-१७ या कालावधीत बाजारात १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.   

चिनी सॉसमध्ये लाल मिरची सॉस, हिरवी मिरची सॉस, व्हिनेगर, सोया सॉस आणि शेझवान चटणीचा समावेश आहे. एकूण चीनी सॉस बाजारामध्ये सध्या २५ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त शेझवान चटणीचा वाटा असून येत्या पाच वर्षांत तो आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. 

 रेसिपी ब्रँडमधील देसी शेझवान चटणी हे मसाल्यांसोबत मिरची, आले, लसूण आणि कांडा यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. आपण हि चवदार चटणी अगदी कशाबरोबरही आणि जवळजवळ सर्वच पदार्थांबरोबर वापरू शकता. हे डीप किंवा स्टीर फ्राय म्हणून वापरले जाऊ शकते, त्यात भात, नूडल्स किंवा पनीर आणि कोंबडीसाठी मॅरीनेड म्हणून वापरले जाऊ शकते.

रेसिपी शेझवान चटणी एक आकर्षक, समकालीन आणि प्रीमियम दिसणार्‍या पॅकेजिंगमध्ये २५० ग्रॅम बाटलीमध्ये उपलब्ध आहे. हे उत्पादन मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद, वडोदरा आणि सूरत या शहरांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे आणि लवकरच अन्य शहरांमधील बाजारात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.