९१स्प्रिंगबोर्डचा स्टार्टअप इकोयंत्रणा निर्माण करण्यासाठी ईयू-इंडिया इनोव्हेशन सेंटरसोबत सहयोग
९१स्प्रिंगबोर्डचा स्टार्टअप इकोयंत्रणा निर्माण करण्यासाठी ईयू-इंडिया इनोव्हेशन सेंटरसोबत सहयोग ~ हा उपक्रम भारतीय बाजारपेठेमध्ये युरोपियन स्टार्टअप्सना गेटवेची सुविधा देणार भारत – फेब्रुवारी २०२१: ९१स्प्रिंगबोर्डसह ईयू-इंडिया इनोव्हेशन सेंटर आता विशेष उपक्रम सादर करत आहे. हा उपक्रम भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये युरोपियन स्टार्टअप्सना प्रवेश करण्याची सुविधा देतो. हा प्रकल्प युरोपियन स्टार्टअप्सची निवड करेल आणि त्यांना भारतीय कंपन्यांसोबत सहयोग करण्यास सुसज्ज करेल , ज्यामुळे भारत व युरोपदरम्यानच्या द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल. यामुळे युरोपियन स्टार्टअप्सना भारतामध्ये त्यांचा व्यवसाय ला ँ च करण्यासोबत विस्तारित करण्यामध्ये आणि त्यांच्या बाजारपेठ प्रवेश धोरणांमध्ये पाठिंबा देत व्यापक प्रमाणात प्रबळ स्थानिक नेटवर्क निर्माण करण्यामध्ये मदत होईल. प्रकल्पाच्या समन्वयक सिव्हिटामधील इंद्रे कुलिकाउस्काइट ( Indre Kulikauskaite ) सांगतात की , सुरूवातीला दोन्ही प्रांतांमधील ७० मुख्य इकोयंत्रणा कंपन्यांना त्यांच्या नेटवर्कम...