अभीबस आयआरसीटीसी ग्राहकांना बस तिकिट बुकिंग्‍जची सेवा देणार

  अभीबस आयआरसीटीसी ग्राहकांना बस तिकिट बुकिंग्‍जची सेवा देणार 

  • आयआरसीटीसीची वेबसाइट व मोबाइल ॲपवर विनासायास मोफत तिकिटींग सेवा देण्‍यासाठी आयआरसीटीसीसोबत करारावर स्‍वाक्षरी  
  • अभीबस आयआरसीटीसी ग्राहकांना त्‍यांच्‍या सर्व खाजगी, तसेच एसआरटीसी बस सेवा देणार  
  • या सहयोगामुळे भारतभरातील आयआरसीटीसी ग्राहकांना १००,००० हून अधिक बस मार्गांची सेवा उपलब्‍ध होणार  

    २५ फेब्रुवारी २०२१: AbhiBus.com या भारताच्‍या बस तिकिटींगसाठी झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ऑनलाइन बाजारस्‍थळाने भारताचे सर्वात मोठे तिकिट बुकिंग व्‍यासपीठ इंडियन रेल्‍वे केटरिंग ॲण्‍ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)सोबत सहयोग करत त्‍यांच्‍या यशस्‍वी कामगिरीमध्‍ये आणखी एका यशाची भर केली आहे. आयआरसीटीसी दररोज ९ लाखांहून अधिक रेल्‍वे तिकिटांची सेवा देते. सोबतच हा सहयोग आयआरसीटीसी ग्राहकांसाठी बस तिकिट बुकिंग सेवा देखील उपलब्‍ध करून देईल, जेथे अभीबस भारत भरात आयआरसीटीसीच्‍या व्‍यासपीठावर बस तिकिटींगची सेवा देईल.  

    अभीबस ही बस तिकिटींगमधील सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीने ई-तिकिटींग व्‍यासपीठ – Abhibus.com आणि त्‍यांचे मोबाइल ॲप्‍स सादर करण्‍यापूर्वी त्‍यांची ऑनलाइन पॅसेंजर रिझर्वेशन यंत्रणा सुरू केल्‍यापासून आतापर्यंत ४५ दशलक्षहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. या सहयोगासह आयआरसीटीसीला १००,००० बस मार्गांवरील बसची यादी मिळेल आणि आयआरसीटीसी ग्राहकांना त्‍यांच्‍या आवश्‍यकतेनुसार स्‍लीपर/नॉन-स्‍लीपर, एसी/नॉन एसी बसेससाठी तिकिटे बुक करण्‍याची सुविधा मिळेल. या सहयोगासह आयआरसीटीसीची त्‍यांच्‍या ग्राहकांसाठी प्रवासासंदर्भात बुकिंग सेवा सुलभ करण्‍याची योजना आहे, जेथे त्‍यांना रेल्‍वे तिकिटांसाठी प्रतिक्षा करावी लागली तर ते त्‍वरित एका व्‍यासपीठावरून दुस-या व्‍यासपीठाकडे न जाता उपलब्‍ध बस सेवेचा लाभ घेऊ शकतील. ज्‍यामुळे प्रवाशांना त्रासमुक्‍त बुकिंगचा अनुभव मिळेल.  
     
    या सहयोगाबाबत बोलताना अभीबसचे मुख्‍य व्‍यावसायिक अधिकारी श्री. शशांक कूना म्‍हणाले, ''ग्राहकांचा अनुभव अधिक संपन्‍न करणे आणि ग्राहकांना त्‍यांच्‍या प्रवास गरजांसंदर्भात, विशेषत: बस प्रवासासाठी बुकिंगची सोयीस्‍कर व त्रासमुक्‍त सेवा देणे ही अभीबसची प्रमुख उद्दिष्‍टे राहिली आहेत. कंपनीने मागील १३ वर्षांमध्‍ये सर्व खाजगी व सरकारी आरटीसी बस ऑपरेटर्ससोबत सहयोग करण्‍यासाठी भारतातील प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये व्‍यापक काम केले आहे. आयआरसीटीसीसोबतचा हा सहयोग अभीबसला उत्तमरित्‍या विकसित होण्‍यामध्‍ये साह्य करेल. तसेच आयआरसीटीसी ग्राहकांना भारताच्‍या सर्वात मोठ्या ऑनलाइन बस यादी त्रासमुक्‍तपणे व त्‍वरित उपलब्‍ध होण्‍यासोबत नाविन्‍यपूर्ण पेमेण्‍ट व प्रमोशनल पर्याय देखील उपलब्‍ध होतील. ज्‍यामधून त्‍यांच्‍या प्रवासाच्‍या सुरूवातीच्‍या स्‍थानापासून शेवटच्‍या स्‍थानापर्यंत आणि पर्यायी कनेक्‍टीव्‍हीटी निवडींची काळजी घेतली जाईल.''  

    आयआरसीटीसीचा प्रवक्‍ता म्‍हणाला, ''आयआरसीटीसीने भारतीय नागरिकांना नेहमीच व्‍यापक प्रवास सुविधा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. देशामधील दुर्गम भागापर्यंत बस तिकिटींग सेवा देण्‍यासोबत अधिक कनेक्‍टीव्‍हीटी प्राप्‍त करण्‍यासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. आयआरसीटीसीचा अभीबससोबत सहयोग आयआरसीटीसीला ऑनलाइन उपलब्‍ध असलेल्‍या व्‍यापक बस यादीसह लाखो प्रवाशांपर्यंत पोहोचण्‍यामध्‍ये मदत करेल. ज्‍यामुळे सुरूवातीच्‍या स्‍थानापासून शेवटच्‍या स्‍थानापर्यंतच्‍या क‍नेक्‍टीव्‍हीटीमधील पोकळी भरून निघेल आणि ट्रेन उपलब्‍ध नसल्‍यास पर्यायी प्रवासाची सेवा देखील मिळेल. विविध राज्‍य आरटीसी व खाजगी बस ऑपरेटर ताफा युजर्सना १००,००० हून अधिक मार्गांमधून निवड करण्‍याची सेवा देईल. आरआयसीटीसी व अभीबस दीर्घकाळापर्यंत हा लाभदायी सहयोग सुरू राहण्‍याची आशा करतात.'' 

    सप्‍टेंबर २०२० मध्‍ये लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्‍यात आल्‍यानंतर अभीबसने मागील ४ ते ५ महिन्‍यांत मागणीमध्‍ये जवळपास २०० टक्‍क्‍यांची प्रबळ वाढ नोंदवली आहे. यामुळे अभीबस १५० हून अधिक नवीन खाजगी ऑपरेटर्स व ३ नवीन सरकारी आरटीसी ऑपरेटर्सना एकीकृत करत पुरवठा पोकळी भरून काढण्‍यामध्‍ये यशस्‍वी झाली आहे. त्‍यांच्‍या एकूण बुकिंग्‍जनी कोविडपूर्वीच्‍या आकडेवारीच्‍या १०० टक्‍क्‍यांहून अधिक आकडेवारीची नोंद केली आहे. आकडेवारींमधील या लक्षणीय वाढीचे श्रेय प्रवास संवेदनांमध्‍ये झालेल्‍या लक्षणीय बदलाला जाते, जेथे बुकिंग्‍ज संदर्भात सणासुदीच्‍या काळात ऑक्‍टोबरमध्‍ये ३२ टक्‍के मासिक वाढ आणि नोव्‍हेंबरमध्‍ये ३६ टक्‍के वाढ झाली. आश्‍चर्य करण्‍यासारखे नाही की गोवा हे लघुकालीन व दीर्घकालीन भेटीसाठी पहिल्‍या क्रमांकाचे गंतव्‍य राहिले आहे. ४५ टक्‍के गोवा अभ्‍यागतांनी ४ दिवसांच्‍या स्‍टेदरम्‍यान अभीबस व्‍यासपीठावर त्‍यांचे रिटर्न तिकिट बुक केले आहे आणि उर्वरित अभ्‍यागतांनी स्‍टेच्‍या १५ ते २० दिवसांनंतर त्‍यांचे रिटर्न तिकिट बुक केले आहे.  

    सध्‍या कंपनीने सहयोग केलेल्‍या विविध राज्‍य परिवहन महामंडळांमध्‍ये एपीएसआरटीसी, टीएसआरटीसी, केरळ आरटीसी, पीआरटीसी (पुदुचेरी), ओएसआरटीसी, केटीसी (गोवा), एमएसआरटीसी, जीएसआरटीसी, यूपीएसआरटीसी, बीएसआरटीसी, एचआरटीसी (हिमाचल), आरएसआरटीसी, हरियाणा रोडवेज, डब्‍ल्‍यूटीसी यांचा समावेश आहे. अभीबसने मागील तीन महिन्‍यांमध्‍ये सातत्‍याने दर दिवसाला ३०,००० बुकिंग्‍जचा टप्‍पा गाठला आहे.  

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE