बॉलीवूड अभिनेता सोनू सूद बरोबर झंडु बामचा सहकार्य करार

बॉलीवूड अभिनेता सोनू सूद बरोबर झंडु बामचा सहकार्य करार


 

मुंबई, ३ ऑगस्ट २०२१: गेली १०० वर्षे वेदनाहारी बाम म्हणून जो सर्वमान्य झाला आहे अशा झंडु बाम या भारतातील आघाडीची एफएमसीजी कंपनी ‘इमामी लिमिटेड’चे उत्पादन व विपणन असलेल्या बामने नुकताच आघाडीचा बॉलीवूड अभिनेता व आपल्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध असलेला प्रख्यात चेहरा सोनू सूद यांना  आपला ब्रँड अॅम्बॅसॅडर म्हणून नियुक्त केले आहे.

 

सोनू सूद गेली कित्येक वर्षे वंचित लोकांसाठी मानवतेचे आणि कल्याणकारी काम करत आले आहेत आणि आपल्या सर्वांना ते या दर्यादिलीसाठी माहित आहेत. या अभिनेत्याची ही मानवतेची बाजू अलीकडे आणखीनच उजळून निघाली ती त्यांनी कोविड साथीच्या दिवसांमध्ये लागलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनच्या वेळी जे काम केले त्यामुळे. त्यांनी स्वतः रस घेऊन आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करून मुंबईत अडकलेल्या हजारो परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यांमध्ये सुखरूप पोहोचवले.

 

‘इमामी लिमिटेड’चे संचालक श्री मोहन गोएंका म्हणाले, “कोविडसंबंधी जो तणाव आपल्या सर्वांना जाणवतो त्यामुळे लाखो लोकांना डोकेदुखी, अंगदुखी होते आणि थकवा येतो. नोकऱ्या जाणे, पगार कमी होणे, आरोग्याचे प्रश्न, एकूणच वातावरणात पसरलेली अनिश्चितता आणि ‘वर्क फ्रॉम होम’च्या या दिवसांमध्ये घरातील मोलकरणीअभावी पडणारी सर्वव्यापी जबाबदारी यांमुळे लोकांना मानसिक व शारीरिक थकवा मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे. झंडु बाम हा एक विश्वासार्ह आयुर्वेदिक वेदनाशामक बाम असून त्यामुळे कित्येकांना त्यांच्या या समस्यांपासून आराम मिळाला आहे.

 

ब्रँडबरोबरच्या आपल्या या नवीन सहकार्याबद्दल बोलताना श्री सोनू सूद म्हणतात, “लोकांचे दुःख आणि वेदना या माझ्या हृदयाला नेहमीच बोचत आल्या आहेत. माझ्याकडे जे काही असेल त्याच्या माध्यमातून मी त्यांच्या दुःखावर फुंकर घालून ते कमी करण्यासाठी मी माझ्या आयुष्यात सदैव प्रयत्न करत आलो आहे. झंडु बाम हा एक प्रख्यात भारतीय ब्रँड असून तो गेली कित्येक दशके करोडो ग्राहकांच्या वेदना हटविण्याचे काम करत आला आहे. समाजातील प्रत्येक स्तरावरील लोकांसाठी तो एक जवळचा ब्रँड आहे. मला असे वाटते की ब्रँडचे हे जे तत्त्वज्ञान आहे ते माझ्या आयुष्यातील दुःखात असलेल्या लोकांना मदत करण्याच्या तत्त्वज्ञानाशी मिळतेजुळते आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM