आरईसीचे सर्वोत्तम कामगिरीचे आर्थिक निकाल घोषित
आरईसीचे सर्वोत्तम कामगिरीचे आर्थिक निकाल घोषित ग्रामीण विदयुतीकरण महामंडळ म्हणजेच आरईसी ( REC ) संचालक मंडळाने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली. त्यानुसार आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक निव्वळ नफा १४,०१९ कोटी रुपये इतका झाल्याचे घोषित केले गेले. त्यामुळे प्रति शेअरमागील लांभाश ५ रुपये इतका दिला गेला आहे. या आर्थिक निकालात व्यवहारातील महसूल १२,६१३ कोटी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ २५ टक्के इतकी आहे. हा आकडा यापूर्वी १०,११३ कोटी इतका होता. त्यामुळे एकूण उत्पन्न १२,६४३ कोटी रुपये झाले असून ही वृद्धीदेखील २५ टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वीचा हा आकडा १०,१२४ कोटी रुपये होता. या कामगिरीमळे निव्वळ व्याजदेखील २९ टक्क्यांनी वाढले असून हा आकडा गेल्या वर्षी ३,४०९ कोटी रुपये होता तो आता ४,४०७ कोटी इतका झाला आहे. त्यामुळे निव्वळ नफादेखील ३९ टक्क्यांनी वाढला असून तो ३,००१ कोटींहून ४,०१६ कोटी रुपये इतका झाला आहे. आरईसीने आतापर्यंत दिलेल्या ए कूण मंजूरीची रक्कम ३४ टक्क्य...