Mirae Asset Capital Market सादर करत आहे 100% ब्रोकरेज शेअरींगसह व्यवसाय भागीदार (अधिकृत भागीदार) कार्यक्रम

 Mirae Asset Capital Market सादर करत आहे 100% ब्रोकरेज शेअरींगसह व्यवसाय भागीदार (अधिकृत भागीदार) कार्यक्रम


उत्पन्नाच्या प्रत्येक स्त्रोताला अनुकूल करण्याच्या पर्यायासह हा कार्यक्रम उत्पन्नाचे 9 स्त्रोत देऊ करतो.



Mirae Asset Capital Markets (India) Private Limited, 19 बाजारपेठांमध्ये जागतिक उपस्थिती असलेल्या आघाडीच्या आर्थिक पॉवरहाऊसपैकी एक, यांनी आपल्या अभूतपूर्व 'Mirae Asset Partners ' कार्यक्रमाचे अनावरण केले आहे. अमर्याद कमाईची क्षमता, लवचिकता आणि Mirae Asset च्या जागतिक कौशल्याच्या निपुणतेसह व्यवसाय भागीदारांना सक्षम करून ब्रोकिंग लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम तयार आहे.


उद्योगक्षेत्रामधील पहिले असे उत्पन्न शेअरींग मॉडेल व्यवसाय भागीदारांना 100% शेअरींगसह 9 भिन्न उत्पन्न स्त्रोतांमधून कमवण्याची संधी देते, त्यांना त्यांची कमाई मोठ्या प्रमाणात वाढवण्यास सक्षम बनवते. ब्रोकरेज, MTF (eMargin) मधून व्याज, Margin Pledge मधून व्याज, DP AMC, प्लेज/अनप्लेज शुल्क, DP विक्री व्यवहार शुल्क, खाते उघडण्याचे शुल्क, DPC आणि संचालन शुल्क हे नऊ उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.


हायब्रिड बिझनेस मॉडेल हे Mirae Asset Partner Program चे वेगळे वैशिष्ट्य आहे. हे सवलत (सलग शुल्क/ऑर्डर) आणि पारंपारिक (% प्रमाण) मॉडेलच्या संयोगातून तयार झाले आहे, जे अधिकृत व्यक्तींना त्यांच्या ग्राहकांसाठी विविध किंमत निश्चितीच्या योजना तयार करण्याची संपूर्ण परिवर्तनशीलता प्रदान करते. 


आणखी एक नवीन पैलू म्हणजे Mirae Asset Partnersसह, व्यवसाय भागीदारांला Mirae Asset वर अवलंबून न राहता त्यांच्या ग्राहकांच्या किंमत निश्चिती योजना अनुकूल  करण्याचा अधिकार मिळेल. हे 100% नियंत्रण त्यांना त्यांच्या ग्राहकांच्या अद्वितीय गरजा आणि प्राधान्यांनुसार ऑफर तयार करू देते. याव्यतिरिक्त, व्यवसाय भागीदारांना संपूर्ण पारदर्शकता, लपलेल्या अटी, वचनबद्धतेची कलमे आणि व्यवसायाचे स्लॅब्ज काढून टाकून सशक्त केले जाईल.


शिवाय, व्यवसाय भागीदारांना मालकी हक्काच्या ऑनलाइन भागीदार डॅशबोर्डद्वारे प्रगत तंत्रज्ञानात प्रवेश असेल, जे किंमत योजना तयार करणे, ग्राहकांचे ऑनबोर्डिंग करणे, योजना अनुकूल करणे आणि ग्राहकांच्या थेट स्थिती आणि अहवालांचा मागोवा घेणे यासारख्या अखंड क्षमता प्रदान करते. 


Mirae Asset Capital Marketचे CEO जिसांग यू म्हणाले, "भारतामधील व्यवसाय भागीदार उद्योग क्षेत्र पुढच्या पिढीसाठी सज्ज आहे. आपल्या भागीदार कार्यक्रमासह Mirae Asset देशभरातील उपलब्ध अफाट संधींचा सक्रियपणे लाभ घेऊन देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचण्याची आमची धोणात्मक वाटचाल दर्शवते. आमच्या नाविन्यपूर्ण भागीदार कार्यक्रमाद्वारे, आम्ही व्यावसायिक भागीदारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करत आहोत, ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याची आणि अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्याची त्यांची क्षमता वाढवत आहोत.” 

अरूण चौधरी, Mirae Asset द्वारे m.Stock चे CBO म्हणाले की, “आम्हाला जाणवते की भारतातील व्यावसायिक भागीदारांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व्यवसाय स्लॅब वचनबद्धता, ब्रोकरेज उत्पन्न कमी करणे, उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत, तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि ग्राहकांच्या वाढलेल्या सेवेच्या मागण्या यांसारख्या असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो. आम्ही या त्रासदायक मुद्द्यांना कसोशीने हाताळले आहे आणि एका क्रांतिकारी कार्यक्रमाचे अनावरण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत जिथे आम्ही 100% उत्पन्न शेअरींग, 9 वेगवेगळे उत्पन्न निर्माण करणारे स्त्रोत, व्यवसायावर 100% नियंत्रण, व्यवसाय लहान असो वा मोठा सर्वांना समान वागणूक, पारदर्शक पेआउट इ. शिवाय, भारतातील MTF (eMargin) आणि Margin Pledge सारख्या नफादायक उत्पादनांमध्ये वाढत्या व्याजामुळे, त्याचा वाटा लवकरच ब्रोकरेज उत्पन्नाच्या पुढे जाईल. आमचे MTF आणि Margin Pledge दर हे उद्योगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहेत आणि आम्ही भागीदारांना आमच्या व्याजदरापेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही गोष्टीचा 80% हिस्सा देऊ करत आहोत, जे त्यांच्या कमाईत लक्षणीय वाढ करण्यासाठी सज्ज आहेत. Mirae Asset मध्ये, आमच्या भागीदारांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते आणि हा कार्यक्रम परस्पर यशासाठी आमच्या समर्पणाचे प्रतीक आहे. सहभागी असलेल्या सर्वांसाठीच ही निर्विवादपणे विजयाची परिस्थिती आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE