रवींद्रनाथ टागोर यांच्या 163 व्या जयंतीनिमित्त एनसीपीए साजरे करणार सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन
रवींद्रनाथ टागोर यांच्या 163 व्या जयंतीनिमित्त एनसीपीए साजरे करणार सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन
मुंबई ९ मे २०२४:- नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) सादर करणार ‘सेलिब्रेटिंग टागोर’ व नोबेल पारितोषिक विजेते, रवींद्रनाथ टागोर यांना श्रद्धांजली देणार.
रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या 163 व्या जयंतीनिमित्त, रविवार 12 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम एनसीपीए मध्ये होणार आहे व हया कर्यक्रमा मध्ये टागोरांनी केलेल्या - बाल्मिकी प्रतिभा, त्रिधारा आणि चांडालिका हया वर आधारित परफॉर्मन्स प्रदर्शित केले जातील.
बाल्मिकी प्रतिभा:- मूलतः 1881 मध्ये टागोरांनी सादर केलेली, नृत्यांजलीचे संस्थापक डॉ. तुषार गुहा या कामगिरीचे दिग्दर्शन करणार आहेत. हे महाकाव्य रामायण लिहिणाऱ्या ऋषी-कवी वाल्मिकीमध्ये भयंकर डाकू रत्नाकर, याच्या परिवर्तनाच्या दंतकथेवर आधारित आहे.
त्रिधारा:- तीन नद्यांचा संगम समुद्रात विलीन होत असल्याचे दर्शवत, राजीब भट्टाचार्य आणि मंडली यांच्या या परफॉर्मन्समध्ये ओडिसी नृत्यातील तीन अनोख्या शैलींची भव्यता पाहायला मिळेल. टागोरांच्या गाण्यांवर आधारित कोरिओग्राफीसह, हे परफॉर्मन्स तीन ओडिसी दिग्गजांसाठी - पंकज चरण दास, देबाप्रसाद दास आणि केलुचरण महापात्रा यांच्यासाठी एक आदर्श असेल.
चांडालिका:- सर्मिष्ठा चट्टोपाध्याय आणि समूह आणि स्वप्नकल्पा दासगुप्ता यांचे नृत्य- नाटक. हे सादरीकरण टागोरांनी 1938 मध्ये तयार केलेल्या त्याच नावाच्या नृत्य-नाटकापासून हे प्रदर्शन प्रेरित आहे.मानवता जपणे, त्याचा प्रसार करणे आणि जातिव्यवस्थेवर एकतेचा संदेश देणे हा या नृत्य-नाट्याचा हेतू आहे.

Comments
Post a Comment