जेराई फिटनेस व प्लस फिटनेस इंडिया यांची भारतभरात १०० जिम सुरू करण्याची विस्तार योजना

 जेराई फिटनेस  प्लस फिटनेस इंडिया यांची

भारतभरात १०० जिम सुरू करण्याची विस्तार योजना

 

फ्रँचायझीचा जागतिक अनुभव आणि भारतीय उत्पादन कौशल्य
एकत्र आल्याने देशभरात संघटित फिटनेस क्षेत्राच्या वाढीला वेग

 

भारतातील फिटनेस उद्योग आता वाढीच्या टप्प्यात वेगाने प्रवेश करीत आहेया पार्श्वभूमीवर जेराई फिटनेस लिआणि प्लस फिटनेस इंडिया यांनी देशभरात १०० जिम सुरू करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहेया भागीदारीत प्लस फिटनेस इंडियाचा जागतिक फ्रँचायझी व्यवस्थापनाचा अनुभव आणि जेराई फिटनेसचा तीन दशकांहून अधिक काळाचा वारसा एकत्र येत आहेत्यामुळे जिम व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी एक मजबूत आणि सहाय्यकारी व्यवस्था तयार होणार आहेभारत अधिक निरोगी आणि तंदुरुस्त बनवणे ही या दोन्ही संस्थांची समान भूमिका या सहकार्यामागे आहे.

 

या सहकार्यामुळे फ्रँचायझी आणि जिमची उपकरणे एकत्र देणारी नवी पद्धत सुरू होत आहे, त्यामुळे जिम सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईलफ्रँचायझीसाठीचे सहाय्य आणि उपकरणांची खरेदी या दोन्ही गोष्टी एकाच व्यवस्थेत मिळाल्यामुळे नवीन उद्योजकांना वेगवेगळ्या पुरवठादारांशी समन्वय साधण्याची गरज कमी होईल आणि जिम सुरू करण्यातील विलंबही टळेलतसेचयामुळे व्यवसायाचा विस्तार करणे सोपे होईलब्रँडची एकसंध ओळख टिकून राहील आणि जिमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकाऊ पद्धतीने वाढू शकेल.

 

जेराई फिटनेस लि.चे अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक राजेश राय म्हणाले,  जिमसाठी लागणारी बहुतांश उपकरणे आम्ही स्वतःच्या कारखान्यात तयार करण्यावर भर दिला आहेत्यामुळे जेराई फिटनेसच्या वाढीत मोठी मदत झाली आहेदेशातच उत्पादन केल्यामुळे दर्जावर चांगले नियंत्रण ठेवता येतेखर्च कमी राहतोआयातीवरील अवलंबन कमी होते आणि मेक इन इंडिया’ या उपक्रमालाही चालना मिळतेआमचा विश्वास असा आहे की फिटनेस उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक गंभीर उद्योजकासाठी फिटनेसच्या पायाभूत सुविधा सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या असाव्यात.

 

जेराई फिटनेस लिआणि प्लस फिटनेस इंडिया यांच्यातील सहकार्यातून जागतिक फ्रँचायझीचा अनुभव आणि भारतीय उत्पादन कौशल्य यांचा संगम घडून आला आहेयातून दोन्ही संस्थांना फिटनेस क्षेत्रातील विस्ताराच्या लाटेत आघाडीवर राहण्यास मदत होणार आहेया भागीदारीमुळे देशभरात संघटित जिम व्यवसायाचा विस्तार अधिक वेगाने होईलतसेच टियर-टियर- आणि टियर- शहरांतील उद्योजकांना प्रोत्साहन मिळेलउच्च दर्जाच्या फिटनेस सुविधांपर्यंत अधिक लोकांना पोहोचता येईल आणि देशभरात दीर्घकालीन आरोग्याविषयी जागरूकताही वाढेल.

 

जेराई फिटनेस लिही कंपनी फिटनेससाठीची उपकरणे तयार करणारी अग्रगण्य उत्पादक म्हणून ओळखली जातेअनेक वर्षांच्या अनुभवातून या कंपनीने उत्पादन प्रक्रियासाठा व्यवस्थापनवितरण व्यवस्था आणि ग्राहक सेवा अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत मजबूत व्यवस्था उभी केली आहेही कंपनी स्वयंचलित उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहेरोबोटिक वेल्डिंगपूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाईनतसेच तुर्की आणि जपानी आधुनिक यंत्रसामग्री यांचा वापर करून कंपनी उत्पादन करते.

 

प्लस फिटनेस इंडियाचे मास्टर फ्रँचायझी सिराज लालानी यांनी सांगितले,“मेट्रो शहरांबरोबरच वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठांमध्येही एक सुबक आणि व्यावसायिक पद्धतीने चालणारे जिमचे जाळे उभारणे हा प्लस फिटनेस इंडियाचा दीर्घकालीन उद्देश आहेदेशभरात १०० जिम सुरू करण्याची ही योजना भारतात वाढत असलेल्या व्यवस्थित आणि दर्जेदार फिटनेस सुविधांच्या मागणीला पूरक आहे.

 

प्लस फिटनेस इंडियाच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख फैझ सुपारीवाला म्हणाले, जेराई फिटनेससोबतच्या या भागीदारीमुळे आमची जागतिक दर्जाची फ्रँचायझी व्यवस्था भारतातील विश्वासार्ह उपकरण उत्पादकाशी जोडली गेली आहेफक्त जिम सुरू करणे हा आमचा उद्देश नाहीतर फ्रँचायझी भागीदारांसाठी नफा मिळवून देणारे आणि दीर्घकाळ टिकणारे व्यवसाय उभे करणे हा आहेत्याचबरोबर देश अधिक निरोगी बनवण्यासही आम्ही हातभार लावत आहोत.

 

प्लस फिटनेस इंडियाही आंतरराष्ट्रीय जिम फ्रँचायझी क्षेत्रातील वेगाने वाढणाऱ्या ब्रँडपैकी एक म्हणून ओळखली जातेया ब्रँडचे जगभरात ३५०पेक्षा जास्त जिम क्लब आहेतते ऑस्ट्रेलियान्यूझीलंडभारत या देशांततसेच आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अनेक देशांमध्ये चालतात२४ तास प्रवेशाची सुविधाजागतिक स्तरावर एकसारखी पायाभूत रचना आणि तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्थापन प्रणाली यामुळे या ब्रँडला विविध देशांमध्ये सातत्यपूर्ण आणि चांगली कामगिरी साधता आली आहे.

 

आरोग्याविषयीची वाढती जागरूकताकॉर्पोरेट वेलनेस कार्यक्रम आणि बदलती जीवनशैली यामुळे येत्या काही वर्षांत भारतामध्ये फिटनेस क्षेत्रातील बाजार मोठ्या प्रमाणात वाढेलअसा अंदाज आहेवझीर अॅडव्हायजर्स या संस्थेच्या एका अहवालानुसारभारतातील फिटनेसच्या उपकरणांचा बाजार २०२४ मध्ये सुमारे ,५०० कोटी रुपयांचा होतातो २०२९ पर्यंत सुमारे ,६०० कोटींवर जाण्याची शक्यता असून या काळात दरवर्षी त्यात सुमारे १३ टक्के वाढ अपेक्षित आहे.

 

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs