युद्धभूमीतून मायदेशी परतण्यासाठी भारताचे ‘मिशन मोड’; आतापर्यंत २.४४ लाख नागरिक देशात सुरक्षित परतले

 युद्धभूमीतून मायदेशी परतण्यासाठी भारताचे ‘मिशन मोड’; आतापर्यंत २.४४ लाख नागरिक देशात सुरक्षित परतले

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी मोहीम; 

विमान आणि जमिनी मार्गांचा वापर करून भारतीयांची सुटका


पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या छायेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार आणि परदेशातील भारतीय दूतावास सध्या ‘मिशन मोड’वर काम करत आहेत. २८ फेब्रुवारीला संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल २ लाख ४४ हजार भारतीय नागरिक सुखरूप मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी नवी दिल्लीत झालेल्या आंतर-मंत्रालयीन बैठकीत या बचाव मोहिमेचा तपशील दिला. त्यांनी सांगितले की, इराणमधून जमिनी मार्गाने ७०० भारतीय नागरिक आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये पोहोचले असून, तिथून त्यांना भारतात आणले जात आहे. विशेष म्हणजे, इराणमध्ये गेलेले सर्व २८४ भाविक सुरक्षित असून, त्यापैकी १३० जण आज दिल्लीत दाखल होत आहेत.

कतारमधील भारतीय दूतावासाने कतार एअरवेजच्या माध्यमातून १,६०० हून अधिक भारतीयांना मायदेशी पाठवले आहे. ज्या नागरिकांना जमिनी मार्गाने परतण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सौदी अरेबियाने तात्पुरता ‘ट्रान्झिट व्हिसा’ उपलब्ध करून दिला आहे. यामुळे नागरिक सलवा बॉर्डरमार्गे प्रवास करू शकत आहेत.

विमानांचे 'एअरलिफ्ट' सुरूच

परराष्ट्र मंत्रालयाचे अप्पर सचिव असीम महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांतील भारतीय दूतावास २४ तास कार्यरत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचा कंट्रोल रूम रात्रंदिवस नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे. सुरुवातीच्या तुलनेत आता मदतीसाठी येणाऱ्या कॉल्स आणि ई-मेल्सचे प्रमाण घटले असून, परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे हे लक्षण आहे, असे  परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार