कॅलिबर मायनिंग अँड लॉजिस्टिक्सचा आयपीओ १७ जुलै २०२६ रोजी खुला होणार
कॅलिबर मायनिंग अँड लॉजिस्टिक्स लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी खुला होणार, प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ४०२ ते ४२४ रुपये निश्चित
दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) प्रत्येकी १० रुपये असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी ४०२ ते ४२४ रुपये किंमतपट्टा (इक्विटी शेअर्स)
बिड/ऑफर खुली होण्याची तारीख - शुक्रवार, १७ जुलै २०२६, आणि बिड/ऑफर बंद होण्याची तारीख - मंगळवार, २१ जुलै २०२६
किमान बिड लॉट ३५ इक्विटी शेअर्सचा आहे आणि त्यानंतर ३५ इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल
मुंबई, मंगळवार, १४ जुलै: कॅलिबर मायनिंग अँड लॉजिस्टिक्स लिमिटेडने (पूर्वीचे नाव कॅलिबर मर्कंटाईल प्रायव्हेट लिमिटेड) आपल्या पहिल्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (आयपीओ) प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचा किंमतपट्टा ४०२ ते ४२४/- रुपये निश्चित केला आहे.
कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ किंवा ऑफर) सबस्क्रिप्शनसाठी शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी खुला होईल आणि मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ३५ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३५ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. आजच्या तारखेला आऊटस्टॅडिंग इक्विटी शेअर्स प्रत्येकी १० रुपयांचे ५,५९,४१,८२३ इक्विटी शेअर्स आहेत.
१० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या ऑफरमध्ये ४०,००० लाख रुपयांपर्यंतच्या नवीन शेअर्सची विक्री (फ्रेश इश्यू) आणि प्रवर्तक (प्रमोटर्स) – मोहित सतीशकुमार चड्ढा, अनुज किशनलाल चड्ढा, मनीष किशनलाल चड्ढा आणि राहुल रोशनलाल चड्ढा यांच्याकडून ५,००० लाख रुपयांपर्यंतच्या शेअर्सच्या विक्रीचा (ऑफर-फॉर-सेल) समावेश आहे.
नवीन विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २०,८०० लाख रुपयांचा वापर कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/पूर्व-परतफेड करण्यासाठी केला जाईल; १६,७०० लाख रुपये व्यावसायिक वाहने, प्लांट आणि मशिनरी खरेदी करण्यासाठी भांडवली खर्चासाठी वापरले जातील आणि उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल. कंपनीने बुक-रनिंग लीड मॅनेजरच्या सल्ल्याने १०,००० लाख रुपयांपर्यंतचे प्री-आयपीओ प्लेसमेंट आधीच पूर्ण केले आहे.
ही ऑफर बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे दिली जात आहे, ज्यामध्ये निव्वळ ऑफरच्या ५०% पेक्षा जास्त भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs) वाटप केला जाणार नाही, आणि निव्वळ ऑफरचा अनुक्रमे १५% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी आणि ३५% पेक्षा कमी नसलेला हिस्सा किरकोळ वैयक्तिक बोलीदारांसाठी निश्चित करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment