मोलबायो डायग्नोस्टिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 10 ऑगस्ट 2026 पासून होणार सुरू
मोलबायो डायग्नोस्टिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री
10 ऑगस्ट 2026 पासून होणार सुरू
·
मोलबायो
डायग्नोस्टिक्स लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी
शेअरसाठी 768 रुपये ते
प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 807 रुपये
पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
·
प्रमुख
गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार, 07 ऑगस्ट 2026 आहे.
·
बोली/ऑफर
सोमवार 10 ऑगस्ट 2026 रोजी खुली
होईल आणि बुधवार, 12 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल.
·
बोली
प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 18 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 1 रुपये
दर्शनी मूल्याच्या 18 इक्विटी
शेअर्सच्या पटीत लावता येईल
·
कर्मचारी
आरक्षण भाग 15 दशलक्ष रु. पर्यंत; पात्र
कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी समभाग 76 रु. ची सवलत देण्यात येत आहे.
मोलबायो डायग्नोस्टिक्स लिमिटेड (''कंपनी'') ने प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) सोमवार 10 ऑगस्ट 2026 पासून प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक कार्यालयीन एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवार, 07 ऑगस्ट 2026 आहे. बोली/ऑफर बुधवार, 12 ऑगस्ट 2026* रोजी बंद होईल. UPI मँडेटची अंतिम वेळ आणि दिनांक बोली/ऑफर बंद होण्याच्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत असेल.
प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 768 रुपये ते प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 807 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 18 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 18 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
या प्रस्तावामध्ये 2,000.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या एकूण मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू तसेच प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून 91,66,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्रीसाठी ऑफर समाविष्ट आहे.
ऑफर फॉर सेल मध्ये एक्सोरा ट्रेडिंग एलएलपी (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 1,811,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; डॉ. चंद्रशेखर भास्करन नायर (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 1,221,000 पर्यंतचे इक्विटी समभाग; इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड III (गुंतवणूकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 1,000,000 पर्यंत इक्विटी समभाग; तसेच पुढील इतर विक्री करणाऱ्या भागधारकांकडून – गोपालकृष्ण मंगळूरे किणी यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 1,125,000 पर्यंत इक्विटी समभाग; जे. गुरू दत्त यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 902,000 पर्यंत इक्विटी समभाग; गोपालकृष्ण संपतगिरी यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 902,000 पर्यंत इक्विटी समभाग; संगीता एम. किणी यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 452,000 पर्यंत इक्विटी समभाग; एम. ए. उषा राणी यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 451,000 पर्यंत इक्विटी समभाग; एम. ए. रोहित यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 248,000 पर्यंत इक्विटी समभाग; श्रुती जी. किणी यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 226,000 पर्यंत इक्विटी समभाग; एम. ए. शरथ यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 202,000 पर्यंत इक्विटी समभाग; च्युबक्का सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 193,000 पर्यंत इक्विटी समभाग; सुजय लिमिटेड यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 193,000 पर्यंत इक्विटी समभाग; शाहीदा अब्दुल कादर यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 97,000 पर्यंत इक्विटी समभाग; विवेक देवराज यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 78,000 पर्यंत इक्विटी समभाग; अब्दुल कादिर मोहम्मद थेरुवाथ यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 48,000 पर्यंत इक्विटी समभाग आणि एम. गणेश कामत यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण मूल्याचे 17,000 पर्यंत इक्विटी समभाग (एकत्रितपणे ''विक्री समभागधारक'') यांचा समावेश आहे.
कंपनीचे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) ( BSE आणि NSE एकत्रितपणे “Stock Exchanges” ) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

Comments
Post a Comment