'कॅप्री लोन्स'कडून अभिनेत्री नयनताराच्या सहभागाने एकीकृत ब्रँड मोहिमेचे अनावरण
'कॅप्री लोन्स'कडून अभिनेत्री नयनताराच्या सहभागाने एकीकृत ब्रँड मोहिमेचे अनावरण
सामान्य भारतीयांच्या आकांक्षांचा गौरव करणारी विशेष मोहीम
'कॅप्री लोन्स' या ब्रँड नावाने कार्यरत असलेली आघाडीची आणि विविध सेवा देणारी बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) - 'कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड'ने (सीजीसीएल) प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा यांचा सहभाग असलेली आपली नवीनतम एकीकृत ब्रँड मोहीम सुरू केली आहे. त्यावर बेतलेली ही प्रसार मोहीम म्हणजे सुलभ, पारदर्शक आणि ग्राहक-केंद्रित आर्थिक उपाययोजना पुरवण्याच्या 'कॅप्री लोन्स'च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणारी आहे.
ब्रँड चित्रपटांमध्ये अभिनेत्री नयनतारा यांचा प्रवास दाखविला गेला असून, शेतकरी आणि उद्योजकांपासून ते कारागीर व नोकरदारांपर्यंत - सामान्य भारतीयांची जिद्द आणि आकांक्षा यांमधून त्यांना कशी प्रेरणा मिळते, हे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्या या लोकांना 'कॅप्री लोन्स'ची ओळख करून देतात. ही प्रसार मोहिम 'कॅप्री लोन्स'ला एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून सादर करते, जो ग्राहकांना योग्य वेळी आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रवासात त्यांना सक्षम बनवतो.
या मोहिमेबद्दल बोलताना 'कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड'चे मार्केटिंग प्रमुख श्री. निशांत गेहलोत म्हणाले, 'कॅप्री लोन्स'मध्ये, आम्हाला लाखो भारतीयांच्या आकांक्षांचा गौरव करायचा होता आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करणारा एक विश्वासार्ह भागीदार म्हणून 'कॅप्री लोन्स'ची ओळख निर्माण करायची होती. गोल्ड लोन जाहिरातपट याच विचाराला पुढे नेतो आणि ग्राहकांना सोन्याकडे केवळ दागिना म्हणून न पाहता, एक मौल्यवान आर्थिक मालमत्ता म्हणून पाहण्यास प्रोत्साहित करतो. अशी मालमत्ता जी आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी वेळेवर आधार देऊ शकते. अभिनेत्री नयनतारा यांनी दोन्ही कथांमध्ये आणलेली अस्सलता आणि आपुलकीमुळे, आम्हाला विश्वास, आदर व 'ग्राहक-प्रथम' सेवा देण्याच्या आमच्या वचनाला अधिक बळकट करतील.

Comments
Post a Comment